वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळीने झोडपले
By दिनेश पठाडे | Published: April 27, 2023 07:09 PM2023-04-27T19:09:55+5:302023-04-27T19:10:13+5:30
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून साततत्याने अवकाळी पाऊस बरसत आहे.
वाशिम : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून साततत्याने अवकाळी पाऊस बरसत आहे. गुरुवारी (दि.२७) रोज सायंकाळी ६ वाजेदरम्यान झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतीपिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत शेतीपिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्याला फटका बसला आहेच शिवाय अनेक ठिकाणी घरांची पडझड होण्यासह मोठमोठे वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मागील काही दिवसांपासून निसर्ग जणू कोपल्याचेच दिसत आहे.
वारंवार वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानातून शेतकरी सावरला नसतानाच गुरुवारी पुन्हा जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यात शेतीपिके नेस्तनाबूत झाली. सहाही तालुक्यात अवकाळीने थैमान घातल्याचे गुरुवारी पहावयास मिळाले. यामुळे भाजीपालावर्गीय पिके, बिजोत्पादन कांदा, हळद, उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले.