वाशिमच्या डॉक्टरचा एका वर्षात ८९२ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा ‘रेकॉर्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:27 PM2018-07-18T14:27:44+5:302018-07-18T14:30:00+5:30
वाशिम - मूळचे वाशिम जिल्ह्याचे रहिवासी तथा गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत असलेल्या डॉ. विजय वानखेडे यांनी नसबंदी शस्त्रक्रियेत केलेल्या कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ला झाली आहे.
वाशिम - मूळचे वाशिम जिल्ह्याचे रहिवासी तथा गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत असलेल्या डॉ. विजय वानखेडे यांनी नसबंदी शस्त्रक्रियेत केलेल्या कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ला झाली आहे. यामुळे वाशिम जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला.
डॉ.विजय वानखेडे हे मुळचे एकांबा ता. मालेगाव येथील रहिवाशी असून ते सध्या गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ने सन्मानित केले जाते. डॉ. वानखेडे यांनी सन २०१६-१७ या वर्षात ८९२ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केल्या. एाका वर्षात ८९२ पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया करणारे ते पहिले भारतीय वैद्यकीय अधिकारी ठरले आहेत. या कामगिरीची दखल घेत त्यांचे नाव ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’वर नोंदविले गेले. प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सन २०१५-१६ व २०१६-१७ या दोन्ही वर्षात त्यांनी महाराष्टÑात सर्वाधिक पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया केल्यामुळे नवी दिल्ली येथे आयोजित पुरुषसंबंदी कार्यशाळेत महाराष्टÑ राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा सन्मानही त्यांना मिळाला. आतापर्यंत त्यांनी १४ हजाराच्यावर स्त्री नसबंदी व ३५०० चे वर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत.