वाशिम : पाणी टंचाई उपाययोजना अंमलबजावणीत दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:23 AM2018-01-29T01:23:10+5:302018-01-29T01:24:11+5:30

वाशिम : एरव्ही दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील पाणी टंचाईचा कृती आराखडा आखला जातो. यंदा मात्र जनतेचा रोष थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबरमध्येच ५१0 गावांमध्ये पाणी टंचाई जाहीर करून ५७८ उपाययोजनांचा ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केला.

Washim: Due to the implementation of water scarcity measures! | वाशिम : पाणी टंचाई उपाययोजना अंमलबजावणीत दिरंगाई!

वाशिम : पाणी टंचाई उपाययोजना अंमलबजावणीत दिरंगाई!

Next
ठळक मुद्देकृती आराखडाच जाहीर करण्याची घाई ५१0 गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एरव्ही दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील पाणी टंचाईचा कृती आराखडा आखला जातो. यंदा मात्र जनतेचा रोष थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबरमध्येच ५१0 गावांमध्ये पाणी टंचाई जाहीर करून ५७८ उपाययोजनांचा ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केला. असे असले तरी टंचाईग्रस्त कुठल्याही गावात अद्याप उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे केवळ कृती आराखडाच जाहीर करण्याची घाई प्रशासनाला झाली होती काय, असा सवाल टंचाईग्रस्त गावांमधून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात उद्भवणार्‍या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी कृती आराखडा तयार करून उपाययोजना आखल्या जातात. त्यानुसार, यंदाच्या पाणी टंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ७९३ गावांपैकी ५१0 गावांमध्ये पाणी टंचाई उद्भवणार असल्याचे प्रशासनाने जाहीर करून त्यासाठी विविध स्वरूपातील ५७८ उपाययोजना राबवाव्या लागतील, असे जाहीर केले. या उपाययोजनांवर ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्चाची तरतूदही करण्यात आली. मात्र, जवळपास दीड महिना उलटूनही प्रस्तावित कृती आराखड्यातील एकही उपाययोजना अद्याप अंमलात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 

Web Title: Washim: Due to the implementation of water scarcity measures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.