वाशिम : तहसील कार्यालयावर धडकला सुशिक्षित बेरोजगारांचा मूक मोर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 08:29 PM2018-02-20T20:29:07+5:302018-02-20T20:31:29+5:30
वाशिम : मागील काही वर्षापासुन शासनाकडून विविध पद भरतीमध्ये अतिशय कमी जागा काढण्यात येत आहे. अतिशय चांगली तयारी करुन सुध्दा कमी जागा असल्यामुळे संधी मिळत नाही त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुशिक्षीत बेरोजगार तथा स्पर्धा परिक्षार्थीच्यावतीने मंगळवार २० फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर प्रा.जितेंद्र काळे प्रा.अक्षय गवई यांच्या नेतृत्वात मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, मागील अनेक वर्षापासून सर्व सुशिक्षीत बेरोजगार स्पर्धा परिक्षाची तयारी करतांना परंतु शासनाकडून विविध पद भरतीमध्ये अत्यतं कमी जागा काढल्या जातात. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, पोलिस भरतीच्या ३० हजार जागा काढण्यात याव्या अन्यथा भरती रद्द करण्यात यावी , वाशिम जिल्ह्यात पोलिस भरती काढण्यात यावी , जि.प.च्या रिक्त जागा भरण्याात याव्या, आॅनलाइृन परिक्षा पध्दत रद्द करण्यात यावी व एम.जी.एस.सी. प्रमाणेच लेखी स्वरुपात परिक्षा घ्याव्यात , तलाठी महाभरती काढण्यात यावी, राज्यसेवा पदसंख्येत वाढ करण्यात यावी, शिक्षक भरती प्रक्रिया त्वरित करावी, विदर्भातील लोकसंख्येच्या प्रमाणात २३ टक्के जागा भरण्यात याव्या या मागण्यांचा समावेश आहे. मानोरा पंचायत समितीते तहसील कार्यालयपर्यंत काढण्यात आलेल्या मुक मोर्चात शेकडो युवक युवती सहभागी झाल्या होत्या. या वेळी सुशिक्षीत बरोजगारच्या शिष्टमंडळाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती वरिष्ठ कार्यालयांना पाठविण्यात आल्या.यावेळी प्रा.जितेंद्र काळे, प्रा.अक्षय गवई, बंडु राठोड, मुस्तीफा शेख, आकाश भगत, दशमुख , अनिल जाधव, नारायण राठोड, गोपाल चव्हाण, सजन राठोड, सपना नोळे, जाई राइोड,जाई नोळे, सुरेखा खोडे, शितल तायडे, योगीता उजने, जगदीश राठोड, अमोल राठोड, इश्वर पाटील, धिरज भगत, संदीप पडघान, अविनाश चव्हाण, अक्षय राठोड, विलास आडे, सतिष जाधव, अक्षय जाधव, आदिश मनवर, प्रफुल इंगोले, दिनेश गायकवाड, आदिंची उपस्थिती होती.