वाशिम : जुन्या पेन्शनसाठी वाशिमात कर्मचाऱ्यांचा मोर्चा
By संतोष वानखडे | Published: March 14, 2023 11:57 AM2023-03-14T11:57:30+5:302023-03-14T11:58:47+5:30
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे भव्यदिव्य मोर्चाही काढला होता.
वाशिम : जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १४ मार्चला वाशिम शहरात कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे भव्यदिव्य मोर्चाही काढला होता. मात्र, त्याऊपरही जून्या पेन्शनसंदर्भात राज्य सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा दिला होता. शासनस्तरावर ठोस कार्यवाहीचे आश्वासन न मिळाल्याने ही चर्चा फिस्कटली आणि १४ मार्चपासून वाशिम जिल्ह्यातील १७ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले. १४ मार्च रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास जुन्या जिल्हा परिषद परिसरातून कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरूवात झाली.
अकोला नाका मार्गे पायदळ मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धडक देणार आहे. दुपारनंतर या मोर्चाचे रुपांतर धरणे आंदोलनात होईल. या मोर्चात मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब नवघरे, जुनी पेंशन हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष निलेश कानडे, जि.प. कर्मचारी महासंघाच्या लिपीकवर्गीय संघटनेचे जिल्हा सचिव रविंद्र सोनोने,अ.भा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय मनवर, रा.सु. इंगळे, राजेश तायडे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय इढोळे, प्रशांत वाझूळकर, जि.प. कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव अमोल कापसे, जि.प. लेखाधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामानंद ढंगारे, सु.ब. जाधव, प्रवीण पंधारे, संदीप घुगे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नीलेश देवकते, प्रमाेद ढाकरके, वरिष्ठ सहायक प्रवीण राऊत, मंगेश वाघ, पंकज खिराडे, भारत राजस, समाजकल्याण निरीक्षक लकडे, विस्तार अधिकारी सचिन गटलेवार, अनिल उलामाले, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव अरूण इंगळे, विस्तार अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन नायक, इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र खडसे, शिक्षक समितीचे विभागीय सरचिटणीस सतीश सांगळे, साने गुरूजी सेवा संघाचे नेते मंचकराव तायडे, जि.प. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश भारती, कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमंत तायडे, विनोद राजगुरू, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य सचिव बालाजी मोटे यांच्यासह शेकडो कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले.