वाशिम : कर्जबाजारी शेतकर्याची झाडाला गळफास घेवून आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:19 IST2018-02-05T00:19:23+5:302018-02-05T00:19:43+5:30
शिरपूरजैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वाघळूद येथील किसन मस्के या कर्जबाजारी शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना ४ फेब्रुवारीला सकाळी ८.३0 वाजता उघडकीस आली.

वाशिम : कर्जबाजारी शेतकर्याची झाडाला गळफास घेवून आत्महत्या!
ठळक मुद्देकिसन मस्के असे शेतकर्याचे नाव
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वाघळूद येथील किसन मस्के या कर्जबाजारी शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना ४ फेब्रुवारीला सकाळी ८.३0 वाजता उघडकीस आली.
आत्महत्या केलेले शेतकरी किसन मस्के यांच्यावर कर्ज थकीत होते. गत तिन चार वर्षांपासून सततची नापिकी असल्याने घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता यामुळे ते विवंचनेत होते. अखेर त्यांनी मृत्युला कवटाळले. याप्रकरणी पोलिसांनी र्मग नोंद केला आहे.