वाशिम : शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 02:08 PM2019-11-02T14:08:57+5:302019-11-02T14:09:07+5:30
मारसुळ येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तेथे सोयाबीनच्या सुडीची होळी केली व त्वरित मदत करण्याची मागणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयातील शेतातील उभे व काढणी केलेले सोयाबीन पीक, कापसासह फळ पिकांचे पावसामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मालेगाव तालुक्यातील मारसुळ येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तेथे सोयाबीनच्या सुडीची होळी केली व त्वरित मदत करण्याची मागणी करण्यात आली. कारंजा तालुकयातील पानझीरा येथील शेतकºयांचे ५ लाखांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकºयांसह विविध संघटना पुढे आल्या आहेत. जिल्हयात नुकसानग्रस्त शेतकºयांकडून सूचना फॉर्म भरुन घेणे सुरु असून जिल्हयात ९० हजाराच्या जवळपास फॉर्म भरण्यात आले असून यामध्ये एकटया कारंजा तालुक्यातील २१ हजार शेतकºयांनी अर्ज भरले आहेत.
कारंजा : तालुक्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकºयांच्या हाता-तोंडासी आलेला सोयाबीनचा घास वाया गेला आहे. शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधित विभागामार्फत वैयक्तीक स्तरावर नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात येणार आहेत. याकरिता शेतकºयांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा सूचना फॉर्म भरावा लागणार आहे. व तो पिकविमा कंपनीच्या संकेतस्थळावर पाठवून त्याची प्रत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावी लागणार आहे. या अनुषंगाने कारंजा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सूचना फॉर्म घेण्यास २९ आॅक्टोंबरपासून सुरूवात झाली. २९ व ३० आॅक्टोंबर या दोन दिवसांत सदर कार्यालयात जवळपास २० हजार ११७ शेतकºयांनी सूचना फॉर्म भरून दिले. यासाठी पिकविमा कंपनीच्यावतीने समन्वयक म्हणून मंगेश घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तीन दिवसांत सूचना फॉर्म देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पिकविमा कंपनीच्या मते नुकसान झाल्यानंतर ४८ तासाच्या आत नुकसानीच्या माहिती पिकविमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. परंतु हे सूचना फॉर्म सादर करतांना त्यासाठी लागणाºया कागदपत्रांच्या जमवाजमवीसाठी शेतकºयांची दमछाक होत आहे. एकीकडे शेतकरºयांनी वैयक्तिक स्वरूपात काढलेला विमा व बँकेमार्फत काढलेला विमा यांचे प्रस्ताव यापुर्वीच विमा कंपनीकडे आॅनलाईन पध्दतीने सादर करण्यात आले आहे. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाऊस सुरू असल्याचे देखील पावसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. एवढे सगळे उघड्या डोळ्यांनी दिसूनही सूचना फॉर्म भरण्याचा हा घाट विमा कंपनीने घातल्याने शेतकºयांना आपले कामधंदे सोडून तसेच वेळ, श्रम व पैसा खर्चून हा सूचना फॉर्म दाखल करावा लागत आहे. एवढे करूनही विमा कंपनी नुकसान भरपाईचे निकष काय लावते हे कोणालाच माहित नाही. तरीही नुकसान भरपाई मिळेल या आशेने कारंजा तालुक्यातील २० हजार शेतकºयांनी सूचना फॉर्म दाखल केले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे.
रयत क्रांती संघटनेचे निवेदन
मानोरा : मानोरा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकºयांना शेत जमीनीचे सात पंचनामे करुन सरसकट नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष हर्षल देशमुख यांनी तहसीलदार यांना ३१ आॅक्टोबर रोजी निवेदन दिले .निवेदनात म्हटले की, शेतातील सोंगुन ठेवलेले सोयाबीन जाग्यावरच सडले तर शेतात लावलेल्या सोयाबीनच्या पाणी शिरल्याने सोयाबीनला कोम फुटले . शिवाय फळ बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सरसकट एकरी दहा हजार रुपये प्रमाणे तात्काळ शेतकºयांना देण्यात यावे व शेतकरी शेतमजूर यांना दहा किलो गहु, तांदुळ साखर स्वस्त धान्य ुदकानातुन देण्यात यावी असे म्हटले आहे. निवेदन तहसील कार्यालयामार्फत तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर वैभव पाचकवडे, प्रशांत भगत, अजय घाडगे, खडसे ,अजय ठोंबरे, आदिच्या स्वाक्षºया आहेत.
जाचक अट रद्द करण्याची मागणी
शेतकºयांना सूचना फॉर्म पिकविमा कंपनीच्या संकेतस्थळावर आॅनलाईन पाठवून त्याची एक प्रत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात देण्याची अट असून याकरिता सातबारा लागतो. सातबारा काढतांना सर्व्हर डाऊन असल्यास शेतकºयांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.