वाशिम: उधारीच्या व्यवहाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांची ‘नाफेड’कडे पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:53 PM2017-12-25T13:53:17+5:302017-12-25T13:56:35+5:30
वाशिम: ‘नाफेड’च्या वतीने चालू हंगामात सोयाबिन, मुग, उडिद आदी शेतमालाची खरेदी केली जात आहे. मात्र, हा व्यवहार उधारीवरच सुरू असून पैशांची तत्काळ गरज असणाºया शेतकऱ्यांनी त्यामुळेच ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवून व्यापाऱ्यांकडे मालाची विक्री करण्यास प्राधान्य दिले आहे.

जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, रिसोड, कारंजा, मालेगाव आणि मानोरा या सहा ठिकाणी ‘नाफेड’चे खरेदी केंद्र सुरू असून त्याअंतर्गत ५ आॅक्टोबर २०१७ पासून सोयाबिन, मूग, उडिद या शेतमालाची ‘आॅनलाईन’ नोंदणी करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीचे पैसे मिळण्याकरिता मोठा विलंब लागत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकरवी सोयाबिन, मूग, उडिदाची दैनंदिन हजारो क्विंटल खरेदी सुरू असताना ‘नाफेड’कडे मात्र गेल्या अडीच महिन्यात सोयाबिन साडेचार हजार क्विंटल आणि मूगाची खरेदी हजार क्विंटलपर्यंत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
५ आॅक्टोबर २०१७ पासून सुरू झालेल्या शेतमाल खरेदीची ४ आॅक्टोबर २०१७ पर्यंतची रक्कम शेतकºयांना अदा करण्यात आली आहे. त्यानंतरचे सुमारे २ कोटी रुपये प्रलंबित असून ते देखील लवकरच शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, वाशिम