पिकविम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांची धावाधाव! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 01:13 PM2019-10-30T13:13:56+5:302019-10-30T13:14:16+5:30

शेतकºयांनी पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी, तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर अर्ज सादर करण्याची एकच घाई केली आहे. 

Washim : Farmers run for crop insurance benefits! | पिकविम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांची धावाधाव! 

पिकविम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांची धावाधाव! 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर मंगळवारी पिक नुकसानापोटी पिकविमा कंपनीकडून आर्थिक भरपाई मिळावी म्हणून शेतकºयांनी पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी, तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर अर्ज सादर करण्याची एकच घाई केली आहे. 
जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाचे आधीच नुकसान झाले, तर गत दोन दिवसांत आलेल्या जोरदार पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील कपाशी आणि तूर या खरीप पिकांसह फळबागा आणि कापणी केलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याने शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. पावसामुळे कपाशीच्या पिकाची बोंडे गळून पडली, तर फुटलेल्या बोंडातील कापूसही ओला झाला. त्याशिवाय फुलावर येत असलेल्या तुरीच्या पिकालाही पावसाचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी तुरीचे पिक जमीनदोस्त झाले. पपई, लिंबू, डाळींब या फळपिकांनाही मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता ज्या शेतकºयांनी पिक विमा योनेत सहभाग घेतला. त्या शेतकºयांच्या शेतातील नुकसानाची पाहणी कृषी व महसूल विभागाकडून मंगळवारी सुरू करण्यात आली.   पिक विम्याचा लाभ घेण्यासाठी पिकांच्या नुकसानाची तक्रार ४८ तासांच्या आत करावी लागणार असून, शेतकºयांना संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी, ज्या बँकेत विमा हप्ता भरला आहे, त्या बँकेत अथवा संबंधित गावाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा, पीक विमा भरल्याची पावती सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांनी प्रशासनाकडून निश्चित केलेल्या केंद्रांवर आवश्यक कागदपत्रांसह धावाधाव सुरू केल्याचे मंगळवारी दिसले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे वैयक्तिक पंचनाम्याची तरतूद आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार असून, या प्रक्रियेतंर्गत मंगळवारपासून जिल्ह्यात पिक नुकसानाची पाहणी कृषी व महसूल विभागाच्या पथकांनी सुरू केली आहे. त्याशिवाय पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी  पिकाच्या नुकसानाची माहिती वैयक्तिकरित्या संबंधित विमा कंपनीचे समन्वयक अथवा ज्या बँकेत विमा हप्ता भरला आहे, त्या बँकेकडे विहित नमुन्यात त्वरीत सादर करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


 पंचनाम्याचे निकष जाचक
पावसामुळे जिल्ह्यात जवळपास सर्वच भागातील तूर, कपाशी या उभ्या पिकांचे तसेच सुड्या लावून ठेवलेल्या आणि कापणी करून शेतात सुकण्यासाठी ठेवलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने जिल्ह्यात नुकासानाची पाहणी सुरू केली आहे. तथापि, ज्या भागात संबंधित दिवशी ६५ मि.मी. किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडलेल्या भागात पंचनामे करण्याचे शासनाचे निकष आहेत. त्यातच पिक विमा काढलेल्या शेतकºयांना मदत मिळेल; परंतु पिक विमा न काढलेल्या शेतकºयांचे काय, हा प्रश्न आहे.  


जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असून, शासनाच्या निकषानुसार संबंधित विभागने पंचनाम्याला सुरुवात केली आहे. याचा अहवाल वरिष्ठस्तरावर पाठविण्यात येईल.
-शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी पिकविमा काढला आहे. त्या शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रांसह पिकविमा कंपनीच्या संबंधित तालुका समन्वयकाकडे अर्ज सादर करावा, तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क साधावा.
- शंकर तोटावर
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

Web Title: Washim : Farmers run for crop insurance benefits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.