Washim: तीन एकरातील पपईवर शेतकऱ्यांने फिरविला ट्रॅक्टर, उत्पादन खर्च निघत नसल्याने घेतला निर्णय

By नंदकिशोर नारे | Published: January 10, 2024 05:14 PM2024-01-10T17:14:49+5:302024-01-10T17:15:08+5:30

Washim News: एकीकडे खुल्या बाजारात शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असताना दुसरीकडे पपईला ही अपेक्षित भाव मिळत नसल्याने कारंजा तालुक्यातील धनज येथील एका शेतकऱ्याने तीन एकरातील पपई पिकावर बुधवारी ट्रॅक्टर फिरविला .

Washim: Farmers turned the tractor on three acres of papaya, the decision was taken as the production cost was not going | Washim: तीन एकरातील पपईवर शेतकऱ्यांने फिरविला ट्रॅक्टर, उत्पादन खर्च निघत नसल्याने घेतला निर्णय

Washim: तीन एकरातील पपईवर शेतकऱ्यांने फिरविला ट्रॅक्टर, उत्पादन खर्च निघत नसल्याने घेतला निर्णय

- नंदकिशाेर नारे
वाशिम  - एकीकडे खुल्या बाजारात शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असताना दुसरीकडे पपईला ही अपेक्षित भाव मिळत नसल्याने कारंजा तालुक्यातील धनज येथील एका शेतकऱ्याने तीन एकरातील पपई पिकावर बुधवारी ट्रॅक्टर फिरविला .

कारंजा तालुक्यातील धनज येथील शेतकरी निनाद गजानन टेकाडे यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली .त्यासाठी त्यांनी जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च केला. परंतु पपई विक्रीस आल्यानंतर केवळ ४ ते ५ रुपये किलोचा दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले.  परिणामी या शेतकऱ्याने बुधवारी १० जानेवारीला आपल्या तीन एकर क्षेत्रातील हिरव्यागार पपई पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याचा निर्णय घेतला. शेतकरी निनाद टेकाडे हे दरवर्षी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून नवनवीन पिके घेतात .त्यानुसार त्यांनी यंदा तीन एकर क्षेत्रात पपईची लागवड केली . त्यानंतर रोपे व मशागत असा एकूण अडीच लाख रुपयांचा खर्च केला,  परंतु आता मात्र ऐनवेळी पपईचे भाव पडल्याने त्यांचा उत्पादन खर्च निघणे ही कठीण झाले.

Web Title: Washim: Farmers turned the tractor on three acres of papaya, the decision was taken as the production cost was not going

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.