वाशिम :  'सोशल डिस्टन्सिंग'चे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 03:21 PM2020-04-11T15:21:08+5:302020-04-11T15:21:27+5:30

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केल्या जात आहेत मात्र नागरिक याकडे कानडोळा करताना दिसून येत आहेत.

Washim: Fiasco of 'social distance' in Washim | वाशिम :  'सोशल डिस्टन्सिंग'चे तीनतेरा

वाशिम :  'सोशल डिस्टन्सिंग'चे तीनतेरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  शासनाकडून सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.पण नागरिकांकडून दिलेल्या सुचनांची पायमल्ली केली जात आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणाºया दुकानांवर, भाजीबाजारात खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केल्या जात आहेत मात्र नागरिक याकडे कानडोळा करताना दिसून येत आहेत.
लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हयाच्या सिमा बंद करण्यात आल्या असून तालुक्याच्या बाजुला असलेल्या यवतमाळ तसेच अकोला , बुलढाणा जिल्हयात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. प्रशासनाने जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता पावले उचलली असून संपूर्ण जिल्हा सिमा बंदी केली. तसेच नागरिकांनाही गर्दी टाळण्याचे , मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परिस्थिती गंभीर असून जनतेने सावध राहण्याचे प्रशासनाच्यावतिने कळकळीचे आवाहन केल्या जात असले तरी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहे. याकरिता प्रशासनाने कठोर होणे गरजेचे झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतिने संपूर्ण जिल्हयात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक कामासाठी केवळ सकाळी ८ ते १२ सूट देण्यात आली आहे. या सूटमध्ये नागरिक चक्क घराबाहेर पडून फिरतांना दिसून येत आहेत. पोलीसांनी हटकलेच तर मेडिकल, दूध, भाजीपाला आणायला जात असल्याचे सांगितले जात आहे.


दररोज भाजी घेणाºयांच्या संख्येत वाढ
४शहरातील अनेक जण संचारबंदी लागू झाल्यापासून दररोज भाजीपाला खरेदीसाठी जात असल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक नागरिक संचारबंदीपूर्वी कधी भाजीपाला आणत नव्हते परंतु ते आज आवर्जुन भाजीपाला खरेदीसाठी बाजारात फिरत असल्याचे चर्चेवरुन पुढे आले आहे. अनेक नागरिक दर आठवडी बाजारातून सप्ताहभराचा भाजीपाला खरेदी करुन ठेवत होते, परंतु संचारबंदीत फिरायचे म्हणून केवळ भाजीपाला खरेदीसाठी निघत असल्याचे चित्र आहे.


पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे
 जिल्हा प्रशासनाच्यावतिने कळकळीचे आवाहन करुनही नागरिक रस्त्यावर येत असल्याने आता पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीया अनेक मान्यवरांच्यावतिने व्यक्त केल्या जात आहेत. संचारबंदीत सकाळी ८ ते १२ ची शिथीलता एक किंवा दोन दिवसाआड करावी जेणे करुन रस्तयावर गर्दी होणार नाही असे काही जणांमध्ये बोलल्या जात आहे.

Web Title: Washim: Fiasco of 'social distance' in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम