वाशिम : अर्थचक्र सुरू होणार; पण जिल्ह्याच्या सिमा बंदच राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:08 AM2020-04-20T10:08:37+5:302020-04-20T10:08:54+5:30

आरोग्य, कृषी यासह इतरही क्षेत्राला संचारबंदीतून काहीअंशी शिथिलता प्रदान करण्यात येत आहे.

Washim: The finance cycle will begin; But the boundaries of the district will remain closed | वाशिम : अर्थचक्र सुरू होणार; पण जिल्ह्याच्या सिमा बंदच राहतील

वाशिम : अर्थचक्र सुरू होणार; पण जिल्ह्याच्या सिमा बंदच राहतील

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ करण्यात आला असून संचारबंदीचा कालावधी देखील वाढविण्यात आला. दरम्यान, २० एप्रिलपासून आरोग्य, कृषी यासह इतरही क्षेत्राला संचारबंदीतून काहीअंशी शिथिलता प्रदान करण्यात येत आहे. यामुळे अर्थचक्र सुरू होणार आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या सिमा मात्र बंदच राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी दिल्या.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या बसेस बंद राहतील. सर्व शैक्षणिक प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग बंद राहतील. आॅटो रिक्षा, सायकल रिक्षा बंद राहतील. सर्व सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा व क्रीडा कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि सभागृह, असेंबली हॉल व इतर तत्सम ठिकाणे, सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्य व इतर मेळाव्यांवरही बंदी कायम असणार आहे. अंत्यविधीसारख्या प्रसंगी २० पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी दिली जाणार नाही.
दरम्यान, २० एप्रिलपासून शेती व फळबागांसंबंधीची सर्व कामे पूर्णपणे कार्यरत राहतील. शेतामध्ये शेतकरी व शेतमजूरांना शेतीविषयक कामे करण्यास मुभा राहणार आहे. कृषी उत्पादने खरेदी करणाऱ्या यंत्रणा तसेच शेतमालाची उद्योगाद्वारे, शेतकऱ्यांद्वारे, शेतकरी गटाद्वारे किंवा शासनाद्वारे होणारे थेट विपणन, हमी भावाने खरेदी करणाºया यंत्रणाची कामे सुरू राहतील. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने चालविण्यात येणाºया मंडी किंवा महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केलेल्या मंडी सुरू राहतील. एकुणच या सर्व बाबींमुळे अर्थचक्र काही अंशी रुळावर येणार आहे, असे असले तरी नियमाचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे.

पशूवैद्यकीय विभागाशी संबंधित ही कामे राहतील सुरू
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार २० एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी दुध संकलन करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याचे वितरण आणि विक्री करण्यास मुभा राहणार आहे. पशुपालन, कुक्कुटपालन व अनुषंगिक कामे देखील सुरू राहतील. तसेच जनावरांच्या छावण्या आणि गोशाळा सुरू ठेवण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ‘मनरेगा’ची कामे मजूरांव्दारे करता येणार आहेत, असेही कळविण्यात आले.


जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी प्रतिष्ठाने राहणार सुरू
पेट्रोल, डिझेल, गॅसची वाहतूक व किरकोळ विक्री सुरु राहील. पोस्ट आॅफीस संबंधित सर्व सेवा सुरू राहतील. पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनाची कार्यवाही याबाबतच्या सुविधा नगर परिषद स्तरावर सुरू राहणार असून दूरसंचार व इंटरनेट सेवा देखील सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी प्रतिष्ठाने, धान्य व किराणा, फळे व भाज्या, पशुखाद्य व चारा विक्रीची दुकाने सुरू राहतील.

औद्योगिक आस्थापनामध्ये कामगारांना कामाच्या ठिकाणी पोहचवण्याची व्यवस्था व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची अंमलबजावणी कंत्राटदाराने करावी, असेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले.

Web Title: Washim: The finance cycle will begin; But the boundaries of the district will remain closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.