वाशिम : बाळखेड येथे आग; चार घरांमधील साहित्य जळून खाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 08:20 PM2018-02-20T20:20:27+5:302018-02-20T20:23:05+5:30
रिसोड (वाशिम) : तालुक्यातील बाळखेड येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास लाकडी माळवद असलेल्या एका घराला अचानक आग लागली. दरम्यान, शेजारी असलेल्या इतर तीन घरांनाही त्याची मोठ्या प्रमाणात झळ पोहचून सुमारे २० लाख रुपयांची वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

याबाबत प्राप्त माहितीनुसार, बाळखेड येथे २० फेब्रुवारीला दुपारी तीन वाजतादरम्यान विजेच्या शॉर्टसर्कीट मुळे एका घराला आग लागली. दरम्यान, लागूनच असलेल्या इतर तीन घरांनाही आगीची झळ पोहचली. पाहता पाहता चारही घरांमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून सुमारे २० लाखांची वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे. नुकसानग्रस्तांमध्ये प्रकाश पºहाड, पोलिस पाटील गजानन पºहाड, भुजंगराव पºहाड व जिजेबा पºहाड यांचा समावेश आहे. आगीत जवळपास २०० पोते हरभरा, शेतीपयोगी अवजारे, घरातील कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आगीत जळून खाक झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रिसोड नगर परिषदेचे अग्नीशमन वाहन घटनास्थळी हजर झाले. आग विझविण्याकरिता गावकºयांनीही आपापल्या परीने सर्वतोपरी योगदान दिले. या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. पोलिस प्रशासन आणि महसुल यंत्रणेने घटनास्थळ गाठून नुकसानाचे पंचनामे केले.