वाशिम : युवक-युवतींना मिळणार मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 06:29 PM2018-02-16T18:29:55+5:302018-02-16T18:31:23+5:30

वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Washim: Free police recruitment training for youths! | वाशिम : युवक-युवतींना मिळणार मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण !

वाशिम : युवक-युवतींना मिळणार मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण !

Next
ठळक मुद्दे२२ फेब्रुवारीला शारीरिक क्षमता चाचणी आता राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत २२ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११ वाजता वाशिम येथील शासकीय वसाहतीजवळील पोलीस परेड मैदान येथे शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. याकरिता इच्छुक युवक, युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त ए. व्ही. मुसळे यांनी शुक्रवारी केले.

समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध योजना व उपक्रम राबविले जातात. शिक्षण, स्वयंरोजगार यासाठीदेखील मोफत प्रशिक्षण दिले जाते. आता राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील वयवर्षे १८ ते २५ वयोगटातील युवक-युवतींना मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. याकरिता पुरुष उमेदवारांची छाती ७८ ते ८३ से.मी. असणे आवश्यक आहे, तसेच उंची किमान १६५ से.मी. असावी. महिलांची उंची किमान १५५ से.मी. असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण तसेच गुणपत्रिका सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. याबरोबरच रहिवाशी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, सेवायोजन नोंदणी प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे सोबत आणणे गरजेचे आहे. निवड झालेल्या युवक-युवतींना अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे तीन महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाबाबतच्या सोयी-सुविधा शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुसळे यांनी सांगितले. इच्छूक युवक व युवतींनी २२ फेब्रुवारी रोजी वाशिम येथील पोलीस परेड मैदान येथे होणाºया शारीरिक क्षमता चाचणीला उपस्थित रहावे, असे आवाहन मुसळे यांनी केले.

Web Title: Washim: Free police recruitment training for youths!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.