वाशिम : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:41 PM2018-02-06T14:41:29+5:302018-02-06T14:45:45+5:30

वाशिम : दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराजांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त उमरा कापसे येथून शेगावला निघालेल्या चार वारकऱ्यांचा बाळापूर-पातूर मार्गावरील बाघ फाट्यानजिक ५ फेब्रुवारीला अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, ६ फेब्रुवारीला सकाळी त्यातील तीघांवर उमरा येथे; तर एकावर जवळा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Washim: Funeral in the mourning atmosphere who died in the accident! | वाशिम : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!

वाशिम : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!

Next
ठळक मुद्देउमरा कापसे येथून शेगावला निघालेल्या चार वारकऱ्यांचा बाळापूर-पातूर मार्गावरील बाघ फाट्यानजिक ५ फेब्रुवारीला अपघातात मृत्यू झाला. ६ फेब्रुवारीला सकाळी त्यातील तीघांवर उमरा येथे; तर एकावर जवळा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतकांच्या कुटुंबियांसह दोन्हीही गावांमधील ग्रामस्थांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

वाशिम : दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराजांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त उमरा कापसे येथून शेगावला निघालेल्या चार वारकऱ्यांचा बाळापूर-पातूर मार्गावरील बाघ फाट्यानजिक ५ फेब्रुवारीला अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, ६ फेब्रुवारीला सकाळी त्यातील तीघांवर उमरा येथे; तर एकावर जवळा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतकांच्या कुटुंबियांसह दोन्हीही गावांमधील ग्रामस्थांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.
गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत उमरा कापसे येथून यंदाही १ फेब्रुवारीला काढण्यात आलेल्या पायदळ वारीत १७० पेक्षा अधिक गजानन भक्तांनी सहभाग नोंदविला होता. मजल-दरमजल करित गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या वारीतील वारकºयांवर मात्र शेगावला पोहचण्यापूर्वीच काळाने झडप घातली. ५ फेब्रुवारीला बाघ फाट्यानजिक दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास काहीकाळ विसावा घेण्यासाठी थांबलेले असताना भरधाव वेगात येणाºया ट्रकने वारीतील तीनचाकी वाहनास जबर धडक दिली. यात वाहनात बसून असलेले काशिनाथ चंद्रभान कापसे (६५), रमेश धनाजी कापसे (३५), लिलाबाई बळीराम कापसे (५८) सर्व रा. उमरा आणि रामजी नामदेव काकडे (५०) रा. जवळा या चार वारकºयांचा मृत्यू झाला. तसेच बळीराम रामजी कापसे (६५), किसनाबाई साबळे (५५) आणि सारजाबाई काशिनाथ कापसे (५८) हे तिघे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, मृतकांवर मंगळवारी सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात उमरा कापसे आणि जवळा येथे अंत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतकांच्या कुटुंबियांसह गावकºयांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवून वारकºयांना अखेरचा निरोप दिला.

 

Web Title: Washim: Funeral in the mourning atmosphere who died in the accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.