वाशिम : मानोरा ‘खविसं’च्या सहा संचालकांचे भविष्य २१ डिसेंबरला ठरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 07:35 PM2017-12-19T19:35:50+5:302017-12-19T19:39:53+5:30

Washim: The future of six directors of Manora Khwisan will be on December 21! | वाशिम : मानोरा ‘खविसं’च्या सहा संचालकांचे भविष्य २१ डिसेंबरला ठरणार!

वाशिम : मानोरा ‘खविसं’च्या सहा संचालकांचे भविष्य २१ डिसेंबरला ठरणार!

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणूक प्रक्रियेदरम्यान मतपत्रिकांवर आढळल्या होत्या आक्षेपार्ह खूणाप्रकरण अकोला येथील सहकार न्यायालयात न्यायप्रविष्ठ २१ डिसेंबर रोजी प्रकरणाची अंतिम सुनावणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणुक दोन वर्षांपूर्वी पार पडली. मतदान प्रक्रियेच्या वेळी एकाच पार्टीच्या सहा उमेदवारांच्या मतपत्रिकांवर विशिष्ट प्रकारच्या आक्षेपार्ह खूणा आढळल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. यासंदर्भात अकोला सहकार न्यायालय येत्या २१ डिसेंबरला अंतीम निर्णय देणार असून त्यावरच संबंधित सहा संचालकांचे भविष्य ठरणार असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 
मानोरा खरेदी-विक्री संघाची निवडणुक सप्टेंबर २०१५ मध्ये पार पडली. सेवा सहकारी मतदार संघातील गजानन राऊत, विठ्ठल राऊत, दुर्योधन चव्हाण, मोतीराम ठाकरे, रुपेश चव्हाण, किशोर राठोड  या सहा उमेदवारांच्या मतपत्रिकांवर विशिष्ट  प्रकारच्या खूणा आढळल्या. यासंदर्भात तेव्हाच आक्षेप नोंदविण्यात आले. मात्र, त्याचा विचार झाला नाही. त्यामुळे सेवा सहकारी मतदार संघातून संबंधित उमेदवार विजयी झाले. या मतदार संघात केवळ ३५ मतदार होते, हे विशेष. दरम्यान, खरेदी-विक्री संघावर जरी सर्व समावेशक आघाडीचे वर्चस्व असले तरी सोसायटी मतदार संघातून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले होते. दरम्यान, मतपत्रिकेत खुना आढळून आल्याने पराभूत झालेले मानोरा तालुका काँगे्रसचे अध्यक्ष इफ्तेखार पटेल व महादेवराव ठाकरे यांनी अकोला सहकार न्यायालयात हे प्रकरण दाखल केले. त्यावर निर्णय देण्याची अंतीम तारीख २१ डिसेंबर असून सहकार न्यायालय काय निर्णय देते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Washim: The future of six directors of Manora Khwisan will be on December 21!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.