वाशिम : परजिल्ह्यातून आलेल्या ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:45 AM2020-03-24T11:45:27+5:302020-03-24T11:45:47+5:30
२० ते २३ मार्च या दरम्यान जिल्ह्यात ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
वाशिम : परदेश, महानगरातून वाशिम जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती गावपातळीवर संकलित केली जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांची सरकारी रुग्णालयात तपासणी केली जात आहे. २० ते २३ मार्च या दरम्यान जिल्ह्यात ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध असून, येथे ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाºया नागरिकांची तपासणी केली जाते. गत चार दिवसात १६०० जणांची तपासणी केली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
मालेगाव
परजिल्ह्यातून मालेगाव तालुक्यात येणाºया नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे दिसून येताच ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली जात आहे. २० ते २३ मार्च या दरम्यान तालुक्यातील २०२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. मालेगाव शहरातील पुणे-मुंबई तसेच परदेशातून आलेल्यांपैकी केवळ पाच रुग्ण तपासणीसाठी आले आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मालेगाव नगरपंचायतने पुणे, मुंबईवरून आलेल्या कोणत्याच माणसांची नोंद ठेवली नाही तसेच त्यांना तपासणीकरिता तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात नेले नाही. मालेगाव शहरातील अनेक युवक-युवती शिक्षणासाठी पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या महानगरात गेले होते. तर काही नागरिक कामानिमित्त पुणे, मुंबई गेले होते. आता सर्व जण परत येत असून, तपासणी केली जात आहे. मात्र, शहरातील नागरिक आरोग्य तपासणीबाबत उदासिन असल्याचे दिसून येते. केवळ पाच जणांनी आरोग्य तपासणी केली आहे.
मानोरा
मानोरा तालुक्यात १५ मार्च ते २३ मार्च या दरम्यान ३२६ जणांची आरोग्य तपासणी केली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. १५ मार्च रोजी पुणे व मुंबई येथून आलेल्या प्रत्येकी एक अशा दोन जणांची आरोग्य तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. १८ मार्च रोजी नाशिक येथून आलेले दोन नागरीक, १९ मार्च रोजी पुणे ३३ व मुंबई २३, २० मार्च रोजी पुणे २४, मुंबई २३, औरंगाबाद २, २१ मार्च रोजी पुणे ५९, मुंबई २४, नांदेड २ व अहमदनगर ९, २२ मार्च रोजी पुणे ४३, मुंबई १३, चंद्रपूर १, नागपूर २, जालना २, २३ मार्च रोजी पुणे ४६, मुंबई ९, वर्धा ३, कलकत्ता १, नागपूर ३ अशा एकूण ३२६ जणांची ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
कारंजा : कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात २१ मार्च रोजी ३२९, २२ मार्च रोजी ५८ आणि २३ मार्च रोजी २०६ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कारंजा येथून कामानिमित्त तसेच शैक्षणिक कारणांसाठी अनेकजण पुणे, मुंबई यासह महानगरामध्ये गेले आहेत. कोरोना विषाणूच्या संभाव्य संसर्गापासून बचावात्मक उपाय म्हणून परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात येणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. कारंजा तालुक्यात २१ ते २३ मार्च या दरम्यान ५९३ जणांची तपासणी करण्यात आली.
मंगरूळपीर
ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे २१ मार्च रोजी एकूण २०७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये मुंबई ४८, पुणे १२७, गुजरात ४, कोल्हापूर ११, अहमदनगर १०, दिल्ली १, श्रीनगर १, नागपूर ३, औरंगाबाद १, पठाणकोट १ यांचा समावेश आहे. २२ मार्च रोजी एकूण ३३ जणांची आरोग्य तपासणी केली असून, यामध्ये अकोला ३, मुंबई १६, पुणे १२, मेहकर २ यांचा समावेश आहे. २३ मार्च रोजी एकूण ८८ जणांची आरोग्य तपासणी केली असून, यामध्ये पुणे ४० आणि मुंबई येथून आलेल्या ४८ नागरिकांचा समावेश आहे.
रिसोड : रिसोड तालुक्यात २१ मार्च रोजी १०, २२ मार्च रोजी ७३ आणि २३ मार्च रोजी १५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. परजिल्ह्यातून रिसोड तालुक्यात येणाºया नागरिकांनी आरोग्य विभागाला माहिती देवुन तपासणी करुन घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य विभागाने केले.