वाशिम:गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणात चुका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:34 AM2018-03-05T01:34:50+5:302018-03-05T01:34:50+5:30

देपूळ : देपूळ परिसरात १३ व १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुका असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकºयांचे कोरडवाहू क्षेत्र असतानाही बागायती दाखविण्यात आले तर काहींना पात्र असूनही डावलण्यात आले, तर काहींचे नुकसान प्रत्यक्ष जमिनीपेक्षाही जादा नोंदविण्यात आले. यासंदर्भात शनिवारी ११ शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार नोंदविली.

Washim: Hotspur area affected by mistakes! | वाशिम:गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणात चुका!

वाशिम:गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणात चुका!

Next
ठळक मुद्देकोरडवाहू क्षेत्र दाखविले बागायती जादा नुकसान दाखविण्याचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क
देपूळ : देपूळ परिसरात १३ व १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुका असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकºयांचे कोरडवाहू क्षेत्र असतानाही बागायती दाखविण्यात आले तर काहींना पात्र असूनही डावलण्यात आले, तर काहींचे नुकसान प्रत्यक्ष जमिनीपेक्षाही जादा नोंदविण्यात आले. यासंदर्भात शनिवारी ११ शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार नोंदविली.
१३ व १४ फेब्रुवारी रोजी देपूळ परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, तूर, हरभरा, कांदा, आंबा, संत्रा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्या चमूमार्फत सर्वेक्षणही करण्यात आले. यामध्ये प्रत्यक्ष गहू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान झालेल्या २० ते २५ शेतकºयांना डावलण्यात आले असून, त्यांना अपात्र लाभार्थींच्या यादीत समाविष्ट केले. तर एकाच शेतकºयाचे नाव हे  गट नंबर एकच असताना, त्याच शेतकºयाच्या पिकांचे नुकसान हे वेगवेगळ्या क्षेत्रावर वेगवेगळे दाखविण्यात आल्याचा तसेच काही शेतकºयांच्या नावावर असलेल्या जमिनीपेक्षा जादा जमिनीचे नुकसान दाखविल्याची बाब देपूळ येथील ११ शेतकºयांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिली. दरम्यान, आमदार लखन मलीक यांनी महादेव ज्ञानबा वाघमारे व इतर ३ शेतकºयांच्या शेतातील प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली होती. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकाच्या चमूने नेमके या चारही शेतकºयांना सर्वेक्षणातून वगळले आहे. त्यामुळे शंका-कुशंकांना पेव फुटले असून, अक्षम्य चुका करणाºयांविरूद्ध ठोस कारवाई करावी, अशी मागणी ११ शेतकºयांनी केली. देपूळ गाव परिसरातील नुकसानाचे पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी एकमुखी मागणी केली.
दरम्यान, विहीर, पाइपलाइन, वीज पुरवठा नसणारे तसेच सिंचित जमीन नसताना बागायती दाखविणाºया शेतकºयांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणीही शेतकºयांनी केली. पात्र लाभार्थ्यांना यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी महादेव वाघमारे यांच्यासह ११ शेतकºयांनी केली. शेतकºयांच्या निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी केली जाईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
 

Web Title: Washim: Hotspur area affected by mistakes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम