Washim: शासन मागण्यांची दखल घेईना; महसूलचे कर्मचारी मागे हटेना, पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच

By सुनील काकडे | Published: July 19, 2024 07:38 PM2024-07-19T19:38:21+5:302024-07-19T19:38:41+5:30

Washim News: विविध स्वरूपातील प्रलंबित मागण्यांसाठी महसूलच्या कर्मचाऱ्यांनी १८ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, शासनस्तरावरून मागण्यांची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही.

Washim: Ignoring Government Demands; The revenue employees did not back down, the agitation continued even on the fifth day | Washim: शासन मागण्यांची दखल घेईना; महसूलचे कर्मचारी मागे हटेना, पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच

Washim: शासन मागण्यांची दखल घेईना; महसूलचे कर्मचारी मागे हटेना, पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच

- सुनील काकडे
वाशिम - विविध स्वरूपातील प्रलंबित मागण्यांसाठी महसूलच्या कर्मचाऱ्यांनी १८ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, शासनस्तरावरून मागण्यांची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. कर्मचाऱ्यांनीही ठाम भूमिका घेवून मागे न हटण्याचा निर्धार केला. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून महसूलचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

महसूल कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध दांगट समितीच्या शिफारशीनुसार मंजूर करावा, महसूल सहायकाची वेतनश्रेणी सुधारण्यात यावी, अव्वल कारकून संवर्गाचे नामकरण करण्यासह इतही प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महसूल विभागाचे जिल्ह्यातील संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. त्याचा थेट परिणाम होवून नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Washim: Ignoring Government Demands; The revenue employees did not back down, the agitation continued even on the fifth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम