वाशिम : विपरित हवामानाचा तुरीला फटका; फुलोराची गळती सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 04:52 PM2017-12-08T16:52:20+5:302017-12-08T16:55:30+5:30
वाशिम: विपरित हवामानाचा फटका तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसत असून, सकाळच्या प्रहरी पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या फुलोºयाची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
वाशिम: विपरित हवामानाचा फटका तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसत असून, सकाळच्या प्रहरी पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या फुलोºयाची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
यंदा अपुºया पावसामुळे कृषी उत्पादनात मोठी घट येत आहे. सोयाबीन, मुग, उदिड या पिकांच्या उत्पादनात अपुºया पावसामुळे मोठी घट झाली, तर बोंड अळीने कपाशीचे नुकसान केले. दरम्यानच्या काळात परतीच्या पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलाने तुरीच्या फुलोºयाची गळती सुरू झाली. त्यामुळे शेंगा धरण्याचे प्रमाण कमी झाले, तर त्यानंतर ओखी वादळामुळे वातावरणात झालेला बदल तुरीच्या पिकासाठी घातक ठरू पाहत आहे. सध्या जिल्ह्यात सकाळच्या प्रहरी ढगाळ वातावरणामुळे दाट धुके पसरत असल्याने तुरीचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळत आहे, तसेच शेंगांवरही किडीचा प्रादूर्भाव होत आहे. वेगवेगळी किटकनाशके फवारूनही शेतकºयांना त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे यंदा इतर खरीप पिकांप्रमाणेख तुरीच्या उत्पादनातही मोठी घट येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. कृषी विभागाकडून या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांना तातडीने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.