वाशिम : तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचे स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 06:30 PM2018-04-18T18:30:18+5:302018-04-18T18:30:18+5:30
वाशिम : तत्कालिन शिक्षणाधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यासंदर्भात विभागीय चौकशीचा प्रस्ताव उपसंचालक अमरावती यांना पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतील सुत्रांकडून प्राप्त झाली.
- नंदकिशोर नारे
वाशिम : तत्कालिन शिक्षणाधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यासंदर्भात विभागीय चौकशीचा प्रस्ताव उपसंचालक अमरावती यांना पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतील सुत्रांकडून प्राप्त झाली.
विश्वास लबडे हे जिल्हा परिषद वाशिम येथे शिक्षणाधिकारी माध्यामिक या पदावर कार्यरत असतांना त्यांनी राष्टÑीय माध्यामिक शिक्षा अभियान या योजनेसाठी प्राप्त झालेला ९४ लाख ३२ हजार निधी वरिष्ठांची व शासनाची दिशाभूल करुन, तसेच आर्थीक नियम डावलून विशिष्ट हेतुने स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा वाशिम येथील चालू खात्यात नियमबाहय वळती केला. त्यामुळे शासनाचे सदर रकमेवर मिळणाºया व्याजाचे नुकसान झालेले आहे. तसेच याबाबत अभिलेख, हिशोबनस्ती, नियमानुसार ठेवलेली नव्हती. याबाबत तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांनी चौकशी समिती गठित केली होती. सदर चौकशी समितीच्या अहवालात राष्टÑीय माध्यामिक शिक्षा अभियान योजनेसाठी प्राप्त निधी ज्या प्रयोजनासाठी आला त्यावर खर्च झाला नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच याबाबत गंभीर स्वरुपाची अनियमितता झाल्यामुळे विश्वास लबडे यांना जबाबदार धरण्यात आले होते. त्यामुळे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना यांनी विश्वास लबडे यांचेविरुध्द महाराष्टÑ नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील नियम ८ नुसार विभागीय चौकशी करण्याकरीता प्रस्ताव शिक्षण उपसंचालक अमरावती यांना १६ एप्रिल रोजी पाठविला आहे.
९४.३२ लाख निधी नियमबाहय वळती
९४.३२ लाख निधी वरिष्ठांची व शासनाची दिशाभूल करुन सर्व नियम बाजुला ठेवून विशीष्ट हेतुने स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा वाशिम येथील चालु खातया नियमबाहय वळती केले. सदर प्रकरण जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या अनेक सभांमध्ये गाजला होता. परंतु नव्यानेच आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना यांनी पेंडिग प्रकरण ताबडतोब हाती घेवून त्यातील सर्व बाजु समजून घेवून प्रकरण शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले. गत काही दिवसाआधी आलेले दिपककुमार यांनी अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेले प्रकरणाचा निवाळा केल्याचे बोलल्या जात आहे.