वाशिम : अतिक्रमणावर चालला 'जेसीबी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:50 PM2020-02-08T15:50:47+5:302020-02-08T15:50:59+5:30

पुसद नाका, हिंगोली नाका व आययूडीपी कॉलनी परिसरातील अतिक्रमण हटवून मोहीमेस प्रारंभ करण्यात आला.

Washim: 'JCB' goes on encroachment | वाशिम : अतिक्रमणावर चालला 'जेसीबी'

वाशिम : अतिक्रमणावर चालला 'जेसीबी'

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम शहरात पुन्हा एकदा ५ फेब्रुवारीपासून अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ झाला. अतिक्रमण हटाव मोहीमेत शहरातील पुसद नाका, हिंगोली नाका व आययूडीपी कॉलनी परिसरातील अतिक्रमण हटवून मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले.
वाशिम शहरात मुख्य रस्त्यालगत तसेच अंतर्गत ठिकाणीही अतिक्रमण फोफावले होते. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या निर्देशानुसार १५ दिवसांपूर्वी मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्या नेतृत्वात वाशिम शहरात अतिक्रमण हटावची धडक मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेनंतर काही ठिकाणी अतिक्रमणधारकांनी पुन्हा अतिक्रमण केल्याचे आढळून येत आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी पुन्हा ५ फेब्रुवारीपासून पोलीस बंदोबस्तात मोहिम राबविण्यात आली.
जुन्या ठिकाणी अतिक्रमण आढळून आल्यास तेथील सर्व साहित्य जप्त करण्याची कारवाई यावेळी करण्यात आली. वाशिम शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शहरवासियांचे सहकार्य आवश्यक आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम अधून-मधून नियमित राबविण्यात येणार असल्याने शहरातील अतिक्रमण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
 

शहरातील अतिक्रमण हटाव मोहीमे दरम्यान काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा केल्यास अतिक्रमण करणाऱ्याच्या वस्तुंवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. शहर स्वच्छ व सुंदर दिसावे याकरिता रस्त्यावर , रस्त्यालगत तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणाºया अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- दीपक मोरे,
मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

Web Title: Washim: 'JCB' goes on encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम