वाशिम,कारंजा व मंगरुळपीर नगर परिषदेची विषय समितीची निवडणूक अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 03:21 PM2020-01-19T15:21:57+5:302020-01-19T15:22:27+5:30
नगर परिषद वाशिम, कारंजा व मंगरुळपीरची विषय समित्यांची १८ जानेवारी रोजी निवडणूक अविरोध झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नगर परिषद वाशिम, कारंजा व मंगरुळपीरची विषय समित्यांची १८ जानेवारी रोजी निवडणूक अविरोध झाली.
वाशिम नगर परिषद विषय समिती व सभापती यांची निवडणूक हि अविरोध झाली असुन या निवडणुकी करिता पिठासीन अधिकारी म्हणुन प्रकाश राउत, उपविभागीय अधिकारी वाशिम व त्यांना सहाय्यक म्हणुन डॉ. विकास खंडारे, मुख्याधिकारी नगर परिषद वाशिम यांचे उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक शंकरलालजी हेडा , उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह ठाकुर यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी सर्व सदस्य गण उपस्थित होते.स्थायी समिती - अशोक शंकरलालजी हेडा अध्यक्ष, भानुप्रतापसिंह रामकुमारसिंह ठाकुर उपाध्यक्ष यांचेके स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती , सार्वजनिक बांधकाम समिती आशाताई खटके, नियोजन विकास समिती शेख अजिम शेख इब्राहीम , पाणी पुरवठा व जलनिसा:रण समिती राधिकाताई उत्तमराव पोटफोडे , शिक्षण, क्रिडा व सांस्कृतीक कार्य समिती राजुभाऊ विठोबा भांदुर्गे ,महिला व बालकल्याण समिती आशाताई सचिन मडके , उपसभापती शितलताई माधवराव ईरतकर, स्थायी समिती सदस्य शेख फिरोज शेख ईस्माइल, राहुलभाऊ मोतीराम तुपसांडे , अतुल वंसतराव वाटाणे यांचा समावेश आहे.
मंगरुळपीर : नगर परिषद मंगरुळपीर च्या विषय समिती निवडणुक अविरोध होऊन उपाध्यक्ष वीरेंदर सिंह ठाकुर आरोग्य सभापती, लईक अहमद बांधकाम सभापती , दुर्गा राजू जयस्वाल पाणी पुरवठा सभापती ,सचिन पवार शिक्षण सभापती व ज्योति विश्वास लवटे महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.मंगरुळपीर येथे निवडणुक अधिकारी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे , मुख्याधिकारी मिलिंद दारोकर यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयात विषय समिती निवडणुक घेण्यात आली. अध्यक्षा डॉ.गजाला खान, उपााध्यक्ष विरेन्द्रसिंह ठाकुर, गटनेता चंदूभाऊ परळीकर, अशोकभाऊ परळीकर, आदिंनी सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कारंजा : कारंजा नगर पालिकेच्या सभापती व स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये मो.युसूफसेठ पुंजानी गटाचा वरचष्मा राहिला. या निवडणुकीचे पिठासिन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अनुप खांडे होते. त्यांना मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी सहकार्य केले. नियोजन व विकास समिती सभापती पदी अॅड.फिरोज छट्टू शेकूवाले, शिक्षण समिती सभापतीपदी शाहीन परवीन ईकबाल हुसैन,आरोग्य सभापतीपदी सलीम शेख लालू गारवे बांधकाम सभापतीपदी मालन भोजा प्यारेवाले, महिला व बालकल्याण वर्षा राजू इंगोले, उपसभापतीपदी रुबीना परवीन इरफान खान तसेच स्थायी समितीमध्ये निसार खान नजीर खान , ईरशाद अली, प्रसन्ना पडसकर यांना घेण्यात आले आहे.