वाशिम : शिकाऊ उमेदवार, कंत्राटी कामगारांचे प्रश्न निघणार निकाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 06:45 PM2017-12-17T18:45:26+5:302017-12-17T19:06:37+5:30

वाशिम: वाढीव विद्यावेतन, सरळ सेवा भरती, उपकेंद्र सहायक भरती, महानिर्मिती तंत्रज्ञ तीनची प्रतीक्षा यादी या व इतर प्रश्नांसंबंधी तांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असोसिएशनने १२ ते १५ डिसेंबरदरम्यान नागपूर येथील विधान भवनासमोर केलेल्या आंदोलनाची दखल घेत महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन्ही कंपनीस्तरावर येत्या २७ डिसेंबर रोजी बैठक लावण्यात आली आहे.

Washim: The learner, the workers of contract workers, will get out of the question! | वाशिम : शिकाऊ उमेदवार, कंत्राटी कामगारांचे प्रश्न निघणार निकाली!

वाशिम : शिकाऊ उमेदवार, कंत्राटी कामगारांचे प्रश्न निघणार निकाली!

Next
ठळक मुद्दे२७ डिसेंबरला कंपनीस्तरावर बैठकतांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असोसिएशनच्या आंदोलनाची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: वाढीव विद्यावेतन, सरळ सेवा भरती, उपकेंद्र सहायक भरती, महानिर्मिती तंत्रज्ञ तीनची प्रतीक्षा यादी या व इतर प्रश्नांसंबंधी तांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असोसिएशनने १२ ते १५ डिसेंबरदरम्यान नागपूर येथील विधान भवनासमोर केलेल्या आंदोलनाची दखल घेत महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन्ही कंपनीस्तरावर येत्या २७ डिसेंबर रोजी बैठक लावण्यात आली आहे. त्यात प्रलंबित प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे, अशी माहिती असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी कळविली.
तीन्ही वीज कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारांना ८० टक्के आरक्षण देण्यात यावे, उपकेंद्र सहायक पदाची परीक्षा घेवून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, महावितरणमध्ये शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत वाढ व्हावी, कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवारांच्या मूळ वेतनात शासनाच्या राजपत्रकानुसार वाढ व्हावी, यासह इतर महत्वपूर्ण पश्न निकाली निघण्याकरिता तांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असोसिएशनने १२ ते १५ डिसेंबर या कालावधीत उपोषण केले. दरम्यान, या उपोषणाची दखल घेत प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने येत्या २७ डिसेंबर रोजी मुख्य कार्यालयात तीन्ही कंपनी प्रशासनासोबत बैठक आयोजित करण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. तथापि, होऊ घातलेल्या बैठकीत प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्धार लहाने यांनी बोलून दाखविला.

Web Title: Washim: The learner, the workers of contract workers, will get out of the question!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम