Washim: महापरिनिर्वाण दिन : हजारो अनुयायांचे महामानवाला अभिवादन !
By संतोष वानखडे | Published: December 6, 2023 09:41 AM2023-12-06T09:41:32+5:302023-12-06T09:41:59+5:30
Mahaparinirvana Day: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
- संतोष वानखडे
वाशिम - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. वाशिम येथे पहाटे ५.३० वाजता स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘कॅन्डल मार्च’ व अभिवादन कार्यक्रम पार पडला.
पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास शहराच्या कानाकोपºयातून समाजबांधव व आंबेडकरी अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आले. प्रत्येकजण हातात ‘कॅण्डल’ घेऊन चौकात आल्यानंतर महामानवाच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत ‘कॅण्डल’ लावण्यात आली. त्यानंतर सामुहिक बुद्धवंदना घेऊन पंचशील, त्रिशरण ग्रहण करण्यात आले. यावेळी त्रिरत्न बुध्द विहार चॅरीटेबल ट्रस्ट वाशीम, भारतरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅक्टिवा फोरम वाशीम, संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ वाशिम, बौध्द कर्मचारी प्रबोधन मंडळ वाशीम, बौध्द युवा संघ वाशीम, जंबुद्विप संघ वाशीम, समता सैनिक दल वाशीम, भारतीय बौध्द महासभा, मंगलमैत्री महिला मंडळ, बुध्द विहार समन्वय महासंघ, भिमनगर बुध्द विहार समन्वय समिती, अकोला नाका बुध्द विहार समन्य समिती, सम्यक आजिवीका बि.सी. संघ वाशिम यांच्यासह विविध सामाजिक संघटना, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर्स, माजी सैनिक, वकिल, प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी, आंबेडकरी अनुयायी व समाजबांधवांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.