वाशिम बाजारपेठ चार दिवसांपासून बंद; प्रशासनाच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांचे लक्ष    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 02:17 PM2018-12-01T14:17:25+5:302018-12-01T14:19:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी गत चार दिवसांपासून शहरातील पार्कींग व्यवस्था बंद करण्याच्या मागणीसाठी दुकाने कडकडीत ...

Washim market closed for four days; traders look at administration's decision | वाशिम बाजारपेठ चार दिवसांपासून बंद; प्रशासनाच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांचे लक्ष    

वाशिम बाजारपेठ चार दिवसांपासून बंद; प्रशासनाच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांचे लक्ष    

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी गत चार दिवसांपासून शहरातील पार्कींग व्यवस्था बंद करण्याच्या मागणीसाठी दुकाने कडकडीत बंद ठेवली आहेत. यावर प्रशासनाच्यावतिने अद्याप कोणताच ठोस तोडगा काढण्यात येत नसल्याने प्रशासन गप्प का? असा सवाल शहरातील नागरिक करीत आहेत. यासंदर्भात संबधित अधिकाऱ्यांना निवेदन देवूनही अद्याप कुठलाही निर्णय झाला नसला, तरी पार्कींग व्यवस्थापकाला ‘शो-कॉज’ नोटीस बजावण्यात आली आहे.
वाशिम शहरात सुरु असलेल्या पार्कींगवाल्यांकडून वापरण्यात येत असलेली अरेरावीची भाषा, कोणताही आचार विचार न करता वाहनांवर लावण्यात आलेला कारवाईच्या सपाटयामुळे नागरिकांसह व्यापारी त्रस्त झाले आहे. गत चार दिवसापूर्वी पार्कींगमध्ये गाडी लावण्यासाठी जागा करीत असतांना रस्त्यावर काही सेकंदापुरते वाहन उभे केले असता कारवाई करण्यात आली. त्यावर वाद होवून प्रकरण चिघळले आणि त्यादिवसांपासून व्यापारी संघ, युवा व्यापारी मंडळाच्यावतिने बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. आज या घटनेला चार दिवस पूर्ण झाले . व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी कोणताही निर्णय एकदम घेता येत नसून नियमानुसार पार्कींगवाल्यांना शोकॉज देण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांच्यावतिने सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी नगरपालिका प्रशासनास पार्कींग व्यवस्थापकास सदरील प्रकरणााबाबत शो कॉज देण्याचे आदेश दिलेत. दरम्यान नगरपरिषद मुख्याधिकारी यांची बदली झाल्याने ती देण्यास विलंब झाला. शेवटी आज  शोकॉज देण्यात आली आहे. यावर आता काय उत्तर पार्कीग व्यवस्थापक देतो व त्यावर काय निर्णय होतो याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत बाजारपेठ बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारशिवाय यावर निर्णय होईल असे वाटत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. या प्रकारामुळे व्यापाºयांचे तर नुकसान होतच आहे शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना सुध्दा याचा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण बाजारपेठ बंद असतांना यावर ताबडतोब तोडगा काढणे गरजेचे असतांना प्रशासन धिम्मगतिने करीत असलेल्या कामाबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
 
पार्कीग व्यवस्थापकाला शो-कॉज नोटीस
४पार्कीग व्यवस्थापकाच्या अरेराविची भाषा, काम करण्याची चुकीची पध्दतीमुळे पार्कीग व्यवस्था बंद करण्याच्या मागणीसाठी व्यापाºयांनी गत चार दिवसांपासून बंद पुकारला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट ही घेतली. जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर तीन दिवसानंतर पार्कींग व्यवस्थापकाला व्यापाºयांनी दिेलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने शो-कॉज नोटीस देण्यात आली आहे. 
४शो-कॉज् ा नोटीस शनिवारी देण्यात आल्याने व दुसºया दिवशी रविवार असल्याने यावर सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत बाजारपेठ बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
व्यापारी निर्णयावर ठाम
४जोपर्यंत पार्कींग व्यवस्था बंद करण्यात येत नाही किंवा त्यांवर कोणताच तोडगा निघत नाही तोपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्याच्या निर्णयावर व्यापारी ठाम दिसून येत आहेत. यामुळे बाजारपेठवर मोठा परिणाम झाला आहे.
४शहरातील बंद असलेल्या बाजारपेठेबाबत व्यापाºयांच्या दररोज मिटींग, बैठका होत असून यावर चर्चा करण्यात येत आहे. पाटणी चौकामध्ये व्यापाºयांच्यावतिने मोठा मंडप टाकण्यात आला असून दररोज येथे व्यापारी येवून आचार विचारांचे प्रदान करीत आहेत.

Web Title: Washim market closed for four days; traders look at administration's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.