वाशिम बाजार समितीचे प्रशासक मंडळ बरखास्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:20 PM2019-07-03T15:20:06+5:302019-07-03T15:20:12+5:30
वाशिम : बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी बाजार समितीचे प्रशासक मंडळ बरखास्त करून १ जुलै रोजी सहायक निबंधक रमेश अंभोरे यांनी वाशिम बाजार समितीचे शासन प्रतिनिधी तथा प्रशासक म्हणून कारभार हाती घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी बाजार समितीचे प्रशासक मंडळ बरखास्त करून १ जुलै रोजी सहायक निबंधक रमेश अंभोरे यांनी वाशिम बाजार समितीचे शासन प्रतिनिधी तथा प्रशासक म्हणून कारभार हाती घेतला.
पावसाळी अधिवेशनात वाशिम बाजार समितीमधील गैरव्यवहारप्रकरणी आमदार सुनील केदार, आमदार सुनील देशमुख यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. बाजार समितीच्या प्रशासक मंडळाला शासनाने समितीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी पाठविताना त्यांना आर्थिक धोरणात्मक निर्णय घेवू नये, असे सुचविले होते; मात्र त्याचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे प्रशासक मंडळास बरखास्त करून बाजार समितीचे प्रशासक तथा शासन प्रतिनिधी म्हणून सहायक निबंधक रमेश अंभोरे यांनी सूत्र स्विकारली. दरम्यान, अंभोरे हे बाजार समितीचा कारभार सांभाळताना शेतकऱ्यांना अपेक्षित न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सचिवांची होणार चौकशी
शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी वाशिम बाजार समितीचे सचिव बबन इंगळे यांना देखील निलंबित करण्याची घोषणा पणनमंत्र्यांनी केली होती. त्यानुषंगाने इंगळे यांच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. बाजार समितीचे रेकॉर्ड ताब्यात घेवून अमरावती निबंधक कार्यालयाच्यावतीने तशा प्रकारची कारवाई लवकरच सचिव इंगळे यांच्या विरुध्द होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.