वाशिम बाजार समितीने दिले कर्मचा‍ऱ्यांना सुरक्षाकवच; प्रत्येकी १० लाखांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 03:22 PM2020-05-05T15:22:45+5:302020-05-05T15:22:57+5:30

प्रत्येक कर्मचा‍ºयांचा १० लाखाचा विमा काढण्यात आला आहे. 

Washim Market Committee provided security to the employees | वाशिम बाजार समितीने दिले कर्मचा‍ऱ्यांना सुरक्षाकवच; प्रत्येकी १० लाखांचा विमा

वाशिम बाजार समितीने दिले कर्मचा‍ऱ्यांना सुरक्षाकवच; प्रत्येकी १० लाखांचा विमा

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क 
वाशिम: जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणू संसर्गाविरुध्द प्रत्येक भारतीय धैर्याने लढा देत आहे. विविध क्षेत्रातील नागरीक या कठिण प्रसंगी सेवा देत असून येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सेवा देणा‍ºया सर्व कर्मचाऱ्यांनाही संस्थेतर्फे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. बाजार समितीचे शासकीय प्रशासक टी. आर.अंभोरे व सचिव बबनराव इंगळे यांच्या पुढाकाराने प्रत्येक कर्मचा‍ºयांचा १० लाखाचा विमा काढण्यात आला आहे. 
वाशिम बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी होते संपूर्ण पश्चिम विदर्भात प्रसिध्द असलेल्या वाशिम बाजार समितीत शेतकºयांची राहण्याची व अल्पदरात जेवणाची सुविधा केली जाते. कोरोना विषाणूचा संसर्ग अन्यजिल्ह्यात वाढत असतांना तसेच संसर्ग पसरण्याचा धोका वाढत असतानाही  बाजार समितीमधील कर्मचारी दररोज सेवा देत आहेत. अशावेळी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी बाजार समितीचे सचिव बबनराव इंगळे व शासकिय प्रशासक अंभोरे यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक कर्मचाºयांचा १० लाखाचा सुरक्षा विमा काढला आहे. या निर्णयामुळे कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Washim Market Committee provided security to the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.