वाशिम बाजार समितीत २०० रुपयाने कमी झाले सोयाबीनचे दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 04:11 PM2018-02-01T16:11:10+5:302018-02-01T16:13:10+5:30

​​​​​​​वाशिम : सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत असून, दोन दिवसांपूर्वी चार हजार रुपये प्रती क्विंटल असलेला दर गुरूवारी ३४०० ते ३८०० रुपयादरम्यान होता. दोन दिवसांत २०० रुपयाने सोयाबीनचे दर कमी झाल्याचे दिसून येते.

Washim market committee: soybean rates reduced by Rs. 200 | वाशिम बाजार समितीत २०० रुपयाने कमी झाले सोयाबीनचे दर !

वाशिम बाजार समितीत २०० रुपयाने कमी झाले सोयाबीनचे दर !

googlenewsNext
ठळक मुद्देजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर बाजार समितीत तर सोयाबीनच्या दराने चार हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. सोमवार, २९ जानेवारीला चार हजार रुपये दर होते. ३० जानेवारी ३९५० असे दर होते. या आठवड्यात सोयाबीनच्या दरात चढ-उतार असल्याचे दिसून येते.

वाशिम : सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत असून, दोन दिवसांपूर्वी चार हजार रुपये प्रती क्विंटल असलेला दर गुरूवारी ३४०० ते ३८०० रुपयादरम्यान होता. दोन दिवसांत २०० रुपयाने सोयाबीनचे दर कमी झाल्याचे दिसून येते.

२०१७ मध्ये अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली होती. सुरूवातीला सोयाबीनला प्रती क्विंटल १७०० ते २५०० रुपये आणि त्यानंतर २३०० ते २८०० रुपयादरम्यान दर मिळाले होते. दैनंदिन व्यवहार पूर्ण करणे, कर्जाची परतफेड, ऊसनवारी, दिवाळीचा बाजार यासह अन्य महत्त्वाच्या कामांसाठी अल्प, मध्यम भूधारक शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात  तर मोठ्या शेतकºयांनी अल्प प्रमाणात दिवाळीपर्यंत मातीमोल भावात सोयाबीनची विक्री केली. साधारणत: नोव्हेंबर २०१७ पर्यंत बाजार समित्यांमध्ये सरासरी सात ते आठ  हजार क्विंटलपर्यंत सोयाबीनची आवक होती. सोयाबीनचे दरही २४०० ते २९०० रुपयादरम्यान स्थिर होते. त्यानंतर सोयाबीनच्या दरात तेजीत येत गेली. जानेवारीपासून तर ३००० ते ३६०० रुपयादरम्यान सोयाबीनला दर होते. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर बाजार समितीत तर सोयाबीनच्या दराने चार हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. सोमवार, २९ जानेवारीला चार हजार रुपये दर होते. ३० जानेवारी ३९५० असे दर होते. ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी ३४०० ते ३८०० रुपयादरम्यान सोयाबीनला दर होते. या आठवड्यात सोयाबीनच्या दरात चढ-उतार असल्याचे दिसून येते. दरम्यान, आता केवळ मोठे शेतकरी आणि व्यापाºयांकडेच सोयाबीन शिल्लक असून, अल्प, मध्यम भूधारक शेतकºयांनी यापूर्वीच सोयाबीन विकलेले आहे.

Web Title: Washim market committee: soybean rates reduced by Rs. 200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.