वाशिम बाजार समितीच्या तज्ज्ञ संचालकांचे अधिकार गोठविले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 05:43 PM2018-09-11T17:43:21+5:302018-09-11T17:43:42+5:30
वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तज्ज्ञ संचालक मंडळाचे अधिकार गोठविण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोठविले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तज्ज्ञ संचालक मंडळाचे अधिकार गोठविण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोठविले आहेत. या संदर्भातील न्यायालयाचा निर्णय सोमवारी घेण्यात आल्याची माहिती माजी संचालक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी मंगळवारी दिली.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ उच्च न्यायालयाच्या आदेशाने बरखास्त करण्यात आल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी तज्ज्ञ संचालकांचे निरीक्षक मंडळ येथे नेमण्यात आले. या संचालकांना कोणतेही आर्थिक अथवा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना तज्ज्ञ संचालकांनी पद भरती, कंत्राट काढणे, बाजार समितीसाठी विकासक नेमण्याची प्रक्रिया राबवित अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करीत सुरेश मापारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने तज्ज्ञ संचालकांचे अधिकार गोठविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सुरेश मापारी यांनी दिली आहे.