वाशिम : संजय गांधी निराधार योजनेची १५ मे रोजी सभा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:05 PM2018-04-11T15:05:20+5:302018-04-11T15:05:20+5:30
वाशिम - वाशिम तहसील कार्यालया अंतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा १५ मे २०१८ रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता घेण्यात येणार.
वाशिम - वाशिम तहसील कार्यालया अंतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा १५ मे २०१८ रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता घेण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांनी आपली परिपूर्ण प्रकरणे १५ एप्रिल पासून ते ५ मे २०१८ पर्यंत महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन सादर कराव्यात, असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शरद पाटील चव्हाण यांनी केले.
फेब्रुवारी २०१८ या महिन्यात झालेल्या सभेत अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. तर काही प्रकरणे ही परिपुर्ण नसल्यामुळे त्रृटीत ठेवण्यात आली आहे. त्रृटीतील प्रकरणावर आगामी होणाºया बैठकीमध्ये चर्चा होवून मंजूरी देण्यात येणार आहे. तत्पूर्वी लाभार्थ्यांनी त्रृटी पुर्ण करुन आपली प्रकरणे महा ई सेवा केंद्रामार्फत सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ हजार रुपये उत्पन्नाचा दाखला व ६५ वर्ष पुर्ण झालेले असावे. कोणत्याच लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला अथवा इतर कागदपत्रासाठी दलालाशी संपर्क साधु नाही. स्वत: महा ई सेवा केंद्रात जावून उत्पन्नाचा दाखला काढावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शरद पाटील चव्हाण हे राहणार असून, यावेळी तहसीलदार बळवंत अरखराव, संजय गांधी निराधार योजना विभागाचे नायब तहसीलदार नप्ते, समिती सदस्य विनोद मगर, प्रल्हाद गोरे, गजानन गोटे, भगवान कोतीवार, पवन जोगदंड, कल्पना खामकर, सिध्दार्थ इंगोले आदींची उपस्थिती राहणार आहे. लाभार्थ्यांनी आपली परिपुर्ण प्रकरणे दलालांच्या भूलथापांना बळी न पडता स्वत: १५ एप्रिल ते ५ मे पर्यंत दाखल करावी, असे आवाहन समितीच्या पदाधिकाºयांनी केले.