वाशिम नगरपरिषदेची ‘कॅशलेस’ व्यवहाराकडे वाटचाल!

By admin | Published: January 6, 2017 08:00 PM2017-01-06T20:00:27+5:302017-01-06T20:00:27+5:30

केंद्रशासनाने नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला, जिल्हयातील अनेक दुकानदारांनी स्वाइपव्दारे व्यवहारही सुरू केलेत.

Washim Municipal Council's 'Cashless' Way to Move! | वाशिम नगरपरिषदेची ‘कॅशलेस’ व्यवहाराकडे वाटचाल!

वाशिम नगरपरिषदेची ‘कॅशलेस’ व्यवहाराकडे वाटचाल!

Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 6 -  केंद्रशासनाने नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला, जिल्हयातील अनेक दुकानदारांनी स्वाइपव्दारे व्यवहारही सुरू केलेत. अनेक शासकीय कार्यालये कॅशलेस व्यवहाराकडे वळत आहेत. वाशिम नगरपरिषद ‘कॅशलेस’ व्यवहाराकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून आले.
वाशिम नगरपरिषद अंतर्गंत घर कर वसुलीसह विविध प्रकाराच्या व्यवहारासाठी स्वाईपचा वापर व्हावा यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. गत आठ दिवसाच्या आत नगरपालिकेचा संपूर्ण व्यवहार कॅशलेस करण्याचा मानस मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी व्यक्त केला. नॅशनल बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती गणेश शेटे यांनी दिली.

Web Title: Washim Municipal Council's 'Cashless' Way to Move!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.