जिल्हयात सर्वाधिक कर वसुली वाशिम नगरपरिषदेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:27 PM2018-04-03T15:27:37+5:302018-04-03T15:27:37+5:30
वाशिम : जिल्हयात असलेल्या चार नगरपालिका व दोन नगरपंचायतीने केलेल्या कर वसुलीत वाशिम नगरपरिषदेची सर्वाधिक करवसुली तर सर्वात कमी कर वसुली मानोरा नगरपंचायतची असल्याची ३१ मार्च अखेरच्या आकडेवारीवरुन दिसून येते.
- नंदकिशोर नारे
वाशिम : जिल्हयात असलेल्या चार नगरपालिका व दोन नगरपंचायतीने केलेल्या कर वसुलीत वाशिम नगरपरिषदेची सर्वाधिक करवसुली तर सर्वात कमी कर वसुली मानोरा नगरपंचायतची असल्याची ३१ मार्च अखेरच्या आकडेवारीवरुन दिसून येते.
नगरपरिषदांचा करवसुली १०० टक्के व्हावी यासाठी नगरपरिषदेच्या प्रत्येक कर विभागाने प्रयत्न केलेत.पर्यांची वारंवार सूचना देवूनही थकीत कराचा भरणा न करणाºयांची यादी प्रकाशित करणे व नोटीसा दिल्याने करवसुली चांगल्या प्रमाणात झालेली दिसून आली. या क्लुप्त्यांमुळे वाशिम नगरपरिषदेची विक्रमी वसुली होवून जिल्हयात सर्वाधिक करवसुलीत प्रथम ठरला आहे. यासाठी वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या व कर निरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एम. उगले, करसंग्राहक एस.एल. किरळकर, एस. ए. इंगळे, डी.एल. देशपांडे, एस.एस. काष्टे, आर.एच. बेनीवाले, एम.डी. इंगळे, एन.के. मुल्ला, के.डी. कनोजे, एस.एल. खान, अ.वहाब शे. चाँद यांनी उत्कृष्ट कार्य केले. जिल्हयात चार नगरपालिका व दोन नगरपंचायतींनी केलेल्या करवसुलीमध्ये वाशिम नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून ६ कोटी २८ लाख ३१ हजार २६९ व नळधारकांकडून ८० लाख ९१ हजार ४१९ रुपये असे एकूण ७ कोटी ६ लाख ८६ हजार ६३० रुपयांची वसुली केली. जी ईतर नगरपालिका व नगरपंचायतीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे रिसोड नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून २ कोटी ३६ लाख २७ हजार ७७८ तर नळधारकांकडून २२ लाख १७ हजार ३६० असे एकूण ३ कोटी ५ लाख ८४ हजार १६६, कारंजा नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून २ कोटी ९५ लाख २३ हजार ६१६ रुपये वसुल केले. नळ कनेक्शन नसल्याने कोणत्याच प्रकारची वसुली नाही. मंगरुळपीर नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून १ कोटी ४० लाख ९३ हजार ५०५ व नळधारकांकडून २२ लाख १७ हजार ३६० रुपये असे एकूण १ कोटी ६३ लाख १० हजार ८६५ , मालेगाव नगरपंचायतने मालमत्ताधारकांकडून ३५ लाख ५७ हजार २४८ व नळधारकांकडून ५ लाख ६५ हजार ६५८ असे एकूण ४१ लाख २३ हजार रुपये तर मानोरा नगरपंचायतकडून मालमत्ताधारकांकडून १६ लाख ५५ हजार ९९६ व नळ धारकांकडून १० लाख ६४ असे एकूण २७ लाख १९ हजार ९९६ रुपये कराची वसुली केली.
कर विभागातील कर निरिक्षक ,संग्राहक यांच्या महतप्रयासाने नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्ताधारकांची करवसुली चांगली झाली आहे. शहराचा विकास व सर्व सुविधा पुरवायच्या असल्यास करवसुली अतिशय महत्वाची आहे. नागरिकांनी स्वताहून कराचा भरणा केल्यास शहराचा विकास होण्यास वेळ लागत नाही. यासाठी कर विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी मोलाची भूमिका बजावल्याने आज नगरपरिषदेची करवसुली विक्रमी होवू शकली.
- गणेश शेटे, मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम