वाशिम पालिकेचा ‘नागरी गौरव’ 

By admin | Published: May 4, 2017 07:36 PM2017-05-04T19:36:43+5:302017-05-04T19:36:43+5:30

उल्लेखनिय कामगिरीबाबत सन्मानपत्र व ३ कोटी रुपयांचा धनादेश देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ४ मे रोजी गौरव करण्यात आला.

Washim Municipal's 'Nagari Gaurav' | वाशिम पालिकेचा ‘नागरी गौरव’ 

वाशिम पालिकेचा ‘नागरी गौरव’ 

Next

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३ कोटी रुपयांचा धनादेश प्रदान : अमरावती विभागात उल्लेखनिय कामगिरी
वाशिम : नागरी गौरव २०१७ अंतर्गत नगरविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतिने अमरावती विभागात आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगतशिल ठेवण्यासाठी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबाबत सन्मानपत्र व ३ कोटी रुपयांचा धनादेश देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ४ मे रोजी गौरव करण्यात आला.
नागरी गौरव २०१७ अंतर्गंत वाशिम नगरपरिषदेने अमरावती विभागात उल्लेखनिय कामगिरी करुन आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगतशिल ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नगराध्यक्ष अशोक हेडा यांना नागरी गौरव २०१७ सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन कोटी रुपयांचा धनादेश व सन्मानपत्र मुख्याधिकारी गणेश शेटे व नगराध्यक्ष अशोक हेडा यांना देवून सन्मानित केले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. वाशिम नगर परिषदेने शहरी भागातील स्वच्छ भारत अभियानमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून भूमिगत गटार योजना, नवीन पाणीपुरवठा योजना, करवसूली, अपंग कल्याण दुर्बल घटक योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींकरिता राबविण्यात आलेल्या विविध महत्वाकांक्षी योजना यासह इतरही कामांमध्ये उल्लेखनिय कार्य केले आहे. एकूणच या सर्व कामांचे शासनाने योग्यरित्या मुल्यमापन करून वाशिम नगर पालिकेला अमरावती विभागातून उत्कृष्ट कार्याचा प्रथम पुरस्कार जाहीर केला व  त्याचे वितरण मुंबई येथे ४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

Web Title: Washim Municipal's 'Nagari Gaurav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.