वाशिम : उघडयावर शौचास जाणा-यांची नावे रेडिओवरुन जाहीर

By admin | Published: January 10, 2017 04:05 PM2017-01-10T16:05:05+5:302017-01-10T16:05:05+5:30

काही बहाद्दर अजुनही उघडयावर जात असल्याने वाशिम नगरपरिषदेतर्फे अशा लोकांची नावे रेडिओवरून जाहीर करण्यात येतात.

Washim: The names of goose-goers released on the radio were released on the radio | वाशिम : उघडयावर शौचास जाणा-यांची नावे रेडिओवरुन जाहीर

वाशिम : उघडयावर शौचास जाणा-यांची नावे रेडिओवरुन जाहीर

Next
>वाशिम नगरपरिषदेचा उपक्रम : चौकात फोटो लावल्यानंतर पुढचे पाऊल
 
नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १० - उघडयावर शौचास जाणा-यांचे उघडयावर जाणे थांबावे यासाठी विविध प्रयत्न करुनही काही बहाद्दर अजुनही उघडयावर जात असल्याने वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी नविन संकल्पना तयार केली. आता उघडयावर शौचास जाणा-यांची नावे ‘रेडिओ वत्सगुल्म’ वरुन जाहीर करण्यात येत आहेत. 
जिल्हयात स्वच्छ शहर ठेवण्यासाठी चारही नगरपरिषदेच्यावतिने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक पुढे वाशिम नगरपरिषद असून वेगवेगळया क्लुप्त्या लढवून उघडयावर शौचास जाणा-यांना रोख देण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. वाशिम नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता अभियान विभागाच्यावतीने नगरपरिषदेमध्ये कर्तव्यावर असलेल्या ८० टक्के कर्मचारी या कामाला भिडले आहेत. नगरपरिषदेच्यावतीने नुकतेच उघडयावर शौचास जाणा-यांची छायाचित्रे शहरातील मुख्य चौका-चौकात झळकवली. यामुळे चांगलाच परिणाम झाल्याने अनेकांनी शौचालय बांधकामांना गती दिली आहे, असे असतांनाही गुडमॉर्निंग पथक पाहणी दरम्यान नेहमी नेहमी तेच ते लोक उघडयावर शौचास जातांना दिसून येत आहे. वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी आता अशा शौच बहाद्दरांची नावे रेडिओ वल्सगुल्मवरुन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. गत दोन दिवसांपासून रेडिओ वत्सगुल्मवर विविध प्रकारच्या टिका टिपण्या करुन उघडयावर शौचास जाणाºयांची नावे जाहीर केल्य जात आहेत. या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतूक होत असून चांगलीच चर्चा रंगत आहेत.
 
‘काय राव पदमतिर्थाच्या बाजुला राहता अन उघडयावर जाता’ची जोरदार चर्चा!
 
उघडयावर शौचास जाणाºयांची नावे आगळयाा-वेगळया पध्दतीने घेतल्या जात असल्याने शहरात ‘काय राव....उघडयावर जाता’ असे म्हणून चर्चा रंगत आहेत. ज्या भागातील नागरिक उघडयावर शौचास जात आहेत त्या भागाचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव घेवून त्यावर टीका टिप्पणीमुळे  शहरात हा विषय चांगलाच चर्चेचा झाला आहे.
 
 
उघडयावर शौचास जाण्यामुळे होणारे आजार पाहता मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली. कडक मोहीमही हाती घेण्यात आली, गांधीगिरी सुध्दा केली तरी काही जण अद्याप उघडयावर शौचास जात असल्याने असा कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. प्रत्येक मनुष्याने आपली मानसिकता बदलून उघडयावर शौचास जाण्याचे दुष्परिणाम जाणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. शहरवासियांन सहकार्य केल्यास हे शक्य सुध्दा आहे. येत्या मार्चपर्यंत शहर हागणदारीमुक्त करायचे आहे. यासाठी प्रयत्न केल्या जात आहेत.
- गणेश शेटे मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

Web Title: Washim: The names of goose-goers released on the radio were released on the radio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.