वाशिम : नाथनंगे महाराजांच्या यात्रोत्सवनिमित्त डव्हा येथे भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 05:47 PM2018-01-18T17:47:23+5:302018-01-18T17:48:55+5:30
मालेगाव: तालुक्यातील श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराज संस्थान येथील यात्रा महोत्सवास १८ जानेवारी प्रारंभ झाला. यानिमित्त हजारो भाविक डव्हा येथे दाखल होत आहेत. यात्रोत्सवाची सांगता २४ जानेवारी रोजी रथ सप्तमीच्या दिवशी महाप्रसाद वितरणाने होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: तालुक्यातील श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराज संस्थान येथील यात्रा महोत्सवास १८ जानेवारी प्रारंभ झाला. यानिमित्त हजारो भाविक डव्हा येथे दाखल होत आहेत. यात्रोत्सवाची सांगता २४ जानेवारी रोजी रथ सप्तमीच्या दिवशी महाप्रसाद वितरणाने होणार आहे.
गुरुवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ५.०० वाजता श्री नाथनंगे महाराज, विश्वनाथ बाबा व संस्थानमधील देवतांच्या मूर्तिंची शाश्वत महापुजा विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आली.यावेळी संस्थानचे अध्यक्ष बाबुराव घुगे सचिव डॉ. निवासराव मुंढे, नारायणराव घुगे, गोवर्धन महाराज गोविंदराव सांगले, सुभाषराव घुगे, आदि उपस्थित होते. या यात्रोत्सवानिमित्त श्रीमद भागवत सप्ताह व विश्वजीवन ग्रंथ सामुदायिक पारायणास सुरुवात झाली. यात्रा महोत्सवात गायत्री जप, श्री विश्वनाथ महाराजकृत अभिषेक व हवन वेद शास्त्र संपन्न शशिकांत देव यांच्या आचार्यत्वाखाली होत आहेत. हभप नारायण महाराज खडकीकर यांच्या वाणीतून श्रीमद भागवत वाचन करण्यात येत आहे. हरीनाम सप्ताह हभप सिताराम महाराज खानझोडे यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे, श्री विश्वाजीवन ग्रंथ व्यासपीठ, हभप श्री गोवर्धन महाराज राऊत सांभाळणार आहेत. सप्ताहात सकाळी ५ .०० ते ६.०० काकडा, श्रीमद भागवत कथा सकाळी १०.००ते दुपारी १२.०० वाजता व सायंकाळी ६.००ते ७.०० हरिपाठ, श्रीहरिकीर्तन रात्री ८.०० ते १०.०० हरिकीर्तन होणार आहे. या भागवताच्या समाप्तीनिमित्त गुरुवार रोजी हभप सिताराम महाराज खांझोडे आसेगाव पेन यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. नंतर श्री नाथ नंगे महाराज यांचा पालखीची मिरवणूक निघेल २५ जानेवारी गुरुवार रोजी हभप श्री नारायण महाराज खडकीकर यांचे किर्तन चाकातीर्थावर होणार यात्रा महोत्सवाची सांगता २४ जानेवारी ला महाप्रसादाने होणार आहे. या यात्रोत्सवात १ लाख भाविक घेणार आहेत.