वाशिम : राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक रामेश्वर पवळ यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:13 AM2017-12-22T02:13:55+5:302017-12-22T02:14:49+5:30
वाशिम : धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयात तारखेवर वारंवार गैरहजर राहणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक रामेश्वर पवळ यांना पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा अकोला येथे अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ३0 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क

रामेश्वर पवळ यांच्याविरोधात वाशिम येथील जिल्हा न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणाची सहा प्रकरणे सुरू आहेत. धनादेश अनादर प्रकरणाच्या सुनावणीच्या प्रत्येक तारखेवर पवळ हे वारंवार गैरहजर राहत होते. अखेर न्यायाधीशांनी पवळ यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वारंट जारी केला. न्यायालयाच्या आदेशानंतर वाशिम शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बी.डी. अवचार, जमादार रमेश तायडे, राजेश बायस्कर, गणेश शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे व सुषमा रंगारी यांचे पथक गेल्या आठवड्याभरापासून पवळ यांचा शोध घेत होते.
पोलीस पथकाला पवळ हे अकोला येथील तुकाराम चौकात त्यांच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २0 डिसेंबरच्या रात्री २ वाजता त्यांना अटक केली. गुरुवारी पवळ यांना जेएमएफसीच्या तीनही न्यायालयात हजर करण्यात आले. पवळ यांनी एका न्यायालयात पैसे भरले. उर्वरित दोन न्यायालयात पैशांचा भरणा न केल्याने जेएमएफसी क्र. १ न्यायालयाने २७ डिसेंबर तर जेएमएफसी क्र. ५ न्यायालयाने ३0 डिसेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.