ध्वनी प्रदूषणावर अधिका-यांचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:32 PM2017-08-21T23:32:13+5:302017-08-21T23:32:13+5:30

washim officers watch on sound polliution | ध्वनी प्रदूषणावर अधिका-यांचा ‘वॉच’

ध्वनी प्रदूषणावर अधिका-यांचा ‘वॉच’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले असून, तक्रार स्विकारण्यासाठी संपर्क क्रमांकही जाहिर केले. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी यांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.
 जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन केली आहे तसेच पोलीस स्टेशननिहाय अधिकारी नियुक्त केले आहेत. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी के. एच. धात्रक  , मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले जिल्हयातील पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षकांसह इतरांचा समावेश आहे.  ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता ८६0५८७८२५४, ८६0५१२६८५७ या क्रमांक देण्यात आले आहेत. 

Web Title: washim officers watch on sound polliution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.