वाशिम : ‘शाळा सिद्धी’ उपक्रमांतर्गत शाळांचे बाहय़ मुल्यमापन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:26 AM2018-02-08T01:26:23+5:302018-02-08T01:28:55+5:30
वाशिम : ‘शाळा सिद्धी’ या शालेय विभागाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत स्वत:च्या शाळांचे स्वयंमुल्यमापन करणार्या जिल्ह्यातील १३७२ शाळांच्या बाह्य मुल्यांकन प्रक्रियेस येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बुधवार, ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी यावेळी उपस्थित मुख्याध्यापकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘शाळा सिद्धी’ या शालेय विभागाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत स्वत:च्या शाळांचे स्वयंमुल्यमापन करणार्या वाशिम जिल्ह्यातील १३७२ शाळांच्या बाह्य मुल्यांकन प्रक्रियेस येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बुधवार, ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी यावेळी उपस्थित मुख्याध्यापकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
शाळांचा गुणात्मक दर्जा वाढविणे, सर्वांगीण सुधारणा यासह इतर महत्वपूर्ण निकषांवर आधारित ‘शाळा सिद्धी’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या व खासगी १0२७ प्राथमिक शाळा, १७0 विद्यालय, १६७ उच्च माध्यमिक विद्यालय, ५ समाजकल्याणच्या शाळा, नवोदय विद्यालय, सैनिक शाळा अशा एकूण १३७२ शाळांनी शालेय विभागाच्या दिशानिर्देशानुसार आपापल्या शाळांचे स्वयंमुल्यमापन केले. त्यात ठरवून दिलेल्या ए, बी, सी ग्रेडनुसार ‘ए’ ग्रेडमध्ये ३१९, ‘बी’ ग्रेडमध्ये ८५३ आणि ‘सी’ ग्रेडमध्ये ९८ शाळांचा समावेश झाला. १0२ शाळांनी या प्रक्रियेत सहभागच घेतला नाही. दरम्यान, आता स्वयंमुल्यमापन करणार्या शाळांचे बाह्य मुल्यांकन करण्यात येत असून त्यासाठी जिल्ह्यातील एका तालुक्यातील शाळांची जबाबदारी दुसर्या तालुक्यांमधील मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली. यामाध्यमातून मुल्यमापन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा संबंधित सर्व शाळांना गुण दिले जातील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नागरे यांनी दिली.