वाशिम : विदर्भाची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र डव्हा येथे यात्रेची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:57 PM2018-01-13T13:57:48+5:302018-01-13T13:59:17+5:30
मालेगाव (वाशिम): विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र डव्हा येथे १७ जानेवारीपासून परमपुज्य नाथनंगे महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या यात्रोत्सवाची जय्यत तयारी संस्थानच्यावतीने सुरू आहे. या निमित्त मंदिराची सजावट करण्यात येत असून, यात्रोत्सवातील कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी विश्वस्तांच्यावतीने नियोजन करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव तालुक्यातील डव्हा येथे नाथ नंगे महाराज संस्थान हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी आयोजित यात्रोत्सवासाठी दरवर्षी लाखो भाविक भक्त येतात, तर रथसप्तमीला पर राज्यांच्या प्रवेशानिमित्त नाथ नंगे महाराज संस्थानच्यावतीने भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेचा उल्लेख केला जातो. यंदा या यात्रेला १७ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. यासाठी संस्थानच्यावतीने यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून, १७ जानेवारीपासून संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यात सकाळी काकडा आरती, जीवन ग्रंथाचे पारायण, भागवत कथा वाचन, प्रवचन आदिंसह नामवंत कीर्तनकारांच्या जाहीर कीर्तनाचे कार्यक्रम येथे होणार आहेत, यात्रोत्सवाच्या समाप्तीनिमित्त २४ जानेवारीला संस्थानच्यावतीने भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल १० एकर शेतात पंगतीद्वारे महाप्रसादाचे वाटप होणार असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी एक लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला संत मंडळीसह जिल्ह्यातील आमदार, खासदारांसह विविध स्थानिक स्वराज्य सस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती राहणार आह. यात्रोत्सवानिमित्त संस्थान परिसरात विविध साहित्याची दुकाने, हॉटेल्स, खेळणी, चित्रपटगृहे, साहित्य प्रदर्शनी आदिंची दुकाने थाटण्यात येणार आहेत.