धनुर्विद्या स्पर्धेत वाशिमचे खेळाडू विजयी
By Admin | Published: November 8, 2014 12:45 AM2014-11-08T00:45:43+5:302014-11-08T00:45:43+5:30
अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयातील धनुर्विद्या स्पर्धा.
वाशिम: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती अंतर्गत अमरावती येथील नरसिम्हा सिनीअर कॉलेज येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयातील धनुर्विद्या स्पर्धेत वाशिम जिल्हयाचे अनेक खेळाडू विजयी ठरले.
कुरुक्षेत्र हरियाणा येथे होणार्या ऑल इंडिया धनुर्विद्या स्पध्रेमध्ये जिल्ह्यातील खेळाडू पात्र ठरले आहेत. वाशिम जिल्हा हौशी धनुर्विद्या असोसिएशन व वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व्दारा वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे विनामुल्य धनुर्विद्येची प्रशिक्षण दिले जाते. धनुर्विद्या जिल्हा मार्गदर्शक अनिल थडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचा लाभ अनेक खेळाडू घेत आहेत. अमरावती येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पध्रेत या प्रशिक्षणातील विद्यार्थी विजयी ठरले. राजस्थान आर्य कॉलेज वाशिम येथील पल्लवी महाले व रश्मी गायकी, तुळशिराम जाधव महाविद्यालय वाशिम येथील गौरव महाजन, प्रदिप राठोड, गोटे कॉलेज वाशिम येथील महेश बोथीकर, सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील पुजा जाधव हे सर्व विद्यार्थी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विजयी ठरल्याने त्यांची निवड ऑल इंडिया धनुर्विद्या स्पर्धेसाठी झाली.