वाशिममध्ये शासन धोरणाविरुद्ध वीज कर्मचा-यांची घोषणाबाजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 03:33 PM2019-01-07T15:33:52+5:302019-01-07T15:34:08+5:30

आपल्या विविध स्वरूपातील मागण्यांच्या पुर्ततेसाठी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीनही कंपन्यांमधील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात ‘एल्गार’ पुकारला

In Washim, power workers against the government Policy! | वाशिममध्ये शासन धोरणाविरुद्ध वीज कर्मचा-यांची घोषणाबाजी!

वाशिममध्ये शासन धोरणाविरुद्ध वीज कर्मचा-यांची घोषणाबाजी!

Next

वाशिम  - आपल्या विविध स्वरूपातील मागण्यांच्या पुर्ततेसाठी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीनही कंपन्यांमधील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात ‘एल्गार’ पुकारला असून सोमवार, ७ जानेवारी रोजी कर्मचा-यांनी कामबंद व एकदिवसीय लाक्षणिक संप केला. यादरम्यान एकत्र जमत शासन धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, वीज कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यात विजेच्या विविध समस्या उद्भवल्याचा सूर उमटत आहे.
महापारेषणमधील ‘स्टाफ सेटअप’ लागू करताना आधीची मंजूर पदे कमी करू नये, महावितरणमधील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करूनच अंमलात आणावी, शासन व व्यवस्थापनाकडून राबविण्यात येत असलेले खासगीकरण, फ्रॅन्चाईझी धोरण थांबवावे, मुंब्रा, शिळ, कळवा आणि मालेगावचे विभाग फ्रॅन्चाईझीवर खासगी भांडवलदार कंपनीने देण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, महानिर्मिती कंपनीचे २१० एमडब्ल्यूचे संच बंद करण्याचे धोरण तत्काळ थांबविण्यात यावे, कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, बदली धोरण पुनर्विचार संघटनेसोबत चर्चा करून राबविण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने संप पुकारला. त्यात शेकडो वीज कर्मचाºयांनी सहभाग नोंदविल्याचे दिसून आले.

Web Title: In Washim, power workers against the government Policy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम