वाशिम : आधार जोडणीअभावी धान्य वितरणात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:13 AM2018-03-07T01:13:15+5:302018-03-07T01:13:15+5:30
वाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाच्यावतीने शिधापत्रिकांना आधार जोडणीचे काम अनिवार्य केले आहे. या प्रक्रियेनुसार शिधापत्रिका आॅनलाइन करून बायोमेट्रिक मशीनच्या आधारे शिधापत्रिकावर धान्य वितरणास सुरुवातही झाली आहे. परंतु, वाशिम जिल्ह्यात अद्याप ९० हजारांहून अधिक लोकांच्या आधार क्रमांकाची शिधापत्रिकांशी जोडणी झालेली नाही. त्यामुळे या प्रणालीत पारदर्शकता निर्माण करण्यात अडचणी येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाच्यावतीने शिधापत्रिकांना आधार जोडणीचे काम अनिवार्य केले आहे. या प्रक्रियेनुसार शिधापत्रिका आॅनलाइन करून बायोमेट्रिक मशीनच्या आधारे शिधापत्रिकावर धान्य वितरणास सुरुवातही झाली आहे. परंतु, वाशिम जिल्ह्यात अद्याप ९० हजारांहून अधिक लोकांच्या आधार क्रमांकाची शिधापत्रिकांशी जोडणी झालेली नाही. त्यामुळे या प्रणालीत पारदर्शकता निर्माण करण्यात अडचणी येत आहेत.
शासनाच्यावतीने अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंबांना स्वस्त धान्य वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्याचे वितरण करण्यात येते. या प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडून बायोमेट्रिक मशीनद्वारे स्वस्त धान्य वितरण करण्याचे ठरविलेले असून, या प्रणालीचा अवलंबही सुरू झाला आहे. या प्रणाली अंतर्गत सुरुवातीला राज्यातील इतर जिल्ह्यांसह वाशिम जिल्ह्यातील शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडणीचे काम करण्यात आले आहे. ही प्रकिया पूर्ण केल्यानंतर पडताळणीदरम्यान प्राप्त आधार क्रमांक ात चुका आढळून आल्या. त्यामुळे बायोमेट्रिक मशीनद्वारे स्वस्त धान्य वितरण होणे शक्य नसल्याने ही प्रक्रिया पुन्हा राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील १८३५४९ अंत्योदय आणि प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ६८५७१२ लोकांच्या आधार क्रमांकांची शिधापत्रिकांना जोडणी करण्याची मोहीम जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने सुरू करण्यात आली. तथापि, या प्रक्रियेला वर्षभराचा कालावधी उलटत आला तरी, अद्यापही ९० हजार लोकांच्या आधार क्रमांकाची जोडणी अद्यापही होऊ शकली नाही. त्यामुळे धान्य वितरणात अडचणी येत आहेत.
आॅफलाइन वितरणाबाबत सूचना...
जिल्ह्यात अद्यापही शिधापत्रिकांना आधार जोडणीचे काम पूर्ण झाले नसले, तरी बायोमेट्रिक मशीनने स्वस्त धान्य वितरणास प्रारंभ झालेला आहे. या प्रणालीत बायोमेट्रिक मशीनवर कुटुंबप्रमुखाच्या अंगठ्याचा ठसा घेऊन शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वितरण करण्यात येत आहे. आता ज्या कुटुंबांचे आधार क्रमांक शिधापत्रिकांशी जोडले गेले नाहीत. त्या शिधापत्रिकाधारकांवर धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊन नये म्हणून पुरवठा विभागाच्यावतीने प्रती ३० स्वस्त धान्य दुकानांसाठी एका कर्मचाºयाकडे जबाबदारी सोपवून आधार न जोडलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आॅफलाइन पद्धतीने स्वस्त धान्य वितरण प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत कुटुंबाला स्वस्त धान्य वितरित केल्यानंतर संंबंधित रेशन दुकानाच्या नोंदवहीत नियुक्त कर्मचाºयांची स्वाक्षरी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.