वाशिम : ६६९ शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न निकाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 05:20 PM2020-12-04T17:20:57+5:302020-12-04T17:21:10+5:30

Washim News जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ३ डिसेंबर रोजी ६६९ शिक्षकांची यादी झळकली.

Washim: The question of selection of 669 teachers has been resolved! | वाशिम : ६६९ शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न निकाली!

वाशिम : ६६९ शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न निकाली!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून प्रलंबित असलेला शिक्षकांचा निवडश्रेणीचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ३ डिसेंबर रोजी ६६९ शिक्षकांची यादी झळकली.
जि.प. शिक्षक संवर्गाचे वेतनश्रेणी प्रस्ताव मागील ३ वर्षांपासून व निवडश्रेणी प्रस्ताव वाशिम जिल्हा अस्तित्वात आल्यापासून प्रलंबित होते.  यासंदर्भात शिक्षकांच्या विविध संघटनांनी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर व रमेश तांगडे यांच्याशी चर्चा केली. सहायक प्रशासन अधिकारी गजानन खुळे व चमूने या कामी गत दीड महिन्यांपासून प्रशासकीय सोपस्कार पार पाडले. वरिष्ठ श्रेणी केंद्रप्रमुख ५, मुख्याध्यापक १६, पदवीधर शिक्षक ८, सहायक शिक्षक ४७४, उच्चश्रेणी शिक्षक ३ व अधिव्याख्याता ३ असे एकूण ५०९  वेतनश्रेणी तसेच निवडश्रेणी पदवीधर २, सहायक शिक्षक १४८, उच्चश्रेणी शिक्षक ६ व अधिव्याख्याता ४ असे एकूण १६० शिक्षक संवर्गातील वरिष्ठ निवडश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. उपरोक्त एकूण ६६९ शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे आदेश जारी करण्यात आले. या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर झळकली आहे. 
गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनश्रेणी व निवडश्रेणीचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार हा प्रश्न निकाली निघाला. पदोन्नती यासह अन्य प्रलंबित प्रश्नही निकाली काढले जातील, असे शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी सांगितले.

Web Title: Washim: The question of selection of 669 teachers has been resolved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.