अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या आॅनलाईन नोंदणीत वाशिम आठव्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 03:50 PM2018-12-04T15:50:39+5:302018-12-04T15:50:57+5:30
वाशिम : ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर आॅनलाईन नोंदी घेतल्या जात आहेत.
वाशिम : ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर आॅनलाईन नोंदी घेतल्या जात आहेत. नोव्हेंबर महिन्याअखेर १ डिसेंबर रोजी घेतलेल्या नोंदीनुसार आॅनलाईन नोंदणीत पश्चिम वºहाडातील बुलढाणा जिल्हा चवथ्या क्रमांकावर, वाशिम आठव्या तर अकोला जिल्हा २६ व्या क्रमांकावर आहे.
जागेअभावी लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहू नये म्हणून निवासी प्रयोजनार्थ शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करावयाच्या धोरणांतर्गत संगणकीय प्रणालीवर नोंद घेण्यात आल्या आहेत. ही मोहिम राज्यभरात राबविली जात आहे. वाशिम जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, १९ हजार ८० नोंदी घेण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ८७० ग्रामपंचायती असून, ३४ हजार ३५ तर अकोला जिल्ह्यात ५३३ ग्रामपंचायती असून, केवळ ३६६८ नोंदी घेण्यात आल्या आहेत. अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी घेतलेल्या या नोंदी प्रमाणित झाल्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही केली जाते. त्यानंतर संबंधित पात्र लाभार्थीला घरकुलाचा लाभ दिला जातो. पश्चिम वºहाडातील वाशिम, बुलडाणा व अकोला जिल्ह्यात आॅनलाईन नोंदी घेण्यात आल्या असून, त्यापुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. राज्यातील आकडेवारीचा विचार करता बुलडाणा व वाशिम जिल्ह्याची कामगिरी सरस असून, त्या तुलनेत अकोला जिल्ह्याची कामकाजाची गती मंदावली असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर आॅनलाईन नोंदी घेण्यात आल्या. या नोंदीत नोव्हेंबर महिन्याअखेर वाशिम जिल्ह्याचा आठवा क्रमांक लागतो. कामकाजाला आणखी गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-नितीन पाटील माने
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद वाशिम.