वाशिम : तालुक्यातील सुपखेला येथील सैनिक शाळेची विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 07:33 PM2018-01-28T19:33:18+5:302018-01-28T19:46:47+5:30
वाशिम : तालुक्यातील सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळची वैज्ञानिक प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी पात्र ठरली आहे. मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तिसरा क्रमांक पटकावलेल्या हायड्रोपॉनिक्स शेती संकल्पनेवर आधारित ही प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनीत ठेवण्यात येणार असून, या यशाबद्दल शाळेतील विज्ञान शिक्षकासह विद्यार्थ्याचा शाळेच्यावतीने शनिवारी सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तालुक्यातील सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळची वैज्ञानिक प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी पात्र ठरली आहे. मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तिसरा क्रमांक पटकावलेल्या हायड्रोपॉनिक्स (हायड्रोपॉनिक्स = जमिनीवाचून केवळ पाण्यात वनस्पती वाढण्याची कला) शेती संकल्पनेवर आधारित ही प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनीत ठेवण्यात येणार असून, या यशाबद्दल शाळेतील विज्ञान शिक्षकासह विद्यार्थ्याचा शाळेच्यावतीने शनिवारी सत्कार करण्यात आला.
सध्याच्या परिस्थीतीत शासनाला भेडसावणारा व ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकरी आत्महत्या याचे कारण म्हणजे निसर्गाचा लहरीपणा पावसाचे अत्यल्प प्रमाण निसर्गाच्या लहरीपणाचा विदर्भातील शेतकºयाला नेहमी फटका बसतो पावसाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करता येईल का, अशी संकल्पना स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेतील विज्ञान शिक्षक अक्षय रविंद्र खंदवे, यांच्या विचारातून बाहेर आली व त्यांनी हायड्रोपॉनिक्स नावाची आधुनिक शेती करण्याची कमीत कमी पावसात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याची एकाच पाण्याचा अनेक वेळा उपयोग घेण्याची शेतीसाठी नवीन संकल्पना असणारी विज्ञान प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड करण्यात आली सदर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी २२,२३,२४ जानेवारी ला श्री शिवाजी माध्य. उच्च माध्य. विद्यालय जउळका रेल्वे जि.वाशिम येथे आयोजित केली होती जिल्ह्यातील अनेक शाळेच्या विज्ञान प्रतिकृतींनी सहभाग नोंदवला होता त्यामधून य.च. सैनिकशाळेच्या हायड्रोपॉलिक्स विज्ञान प्रतिकृतीने तृतीय क्रमांक पटकाविला सदर विज्ञान प्रतिकृतीची उपयुक्त माहिती वर्ग ७ व अचे विद्यार्थी कुमार प्रशांत दिनकर लकडे तथा प्रतिक कळंबे यांनी दिली. सदर यशस्वी विज्ञान प्रतिकृती निर्माण करणाºया शिक्षक तथा विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव ठाकरे, दिलीप पाटील, शाळेचे प्राचार्य एम.एस.भोयर, कर्नल पी.पी.ठाकरे यांनी स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्रक तथा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.अभिनंदन केले तथा परोळा जि.जळगाव येथे होणाºया राज्यसतरीय प्रदर्शनीसाठी शुभेच्छा दिल्या असे प्रसिद्धी प्रमुख के.व्ही. बोबडे , आर.आर.पडवाल यांनी सांगितले.