वाशिम : १५ दिवसात केवळ चार तालुक्याचा अहवाल पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 01:42 PM2019-11-23T13:42:28+5:302019-11-23T13:42:37+5:30
प्रशासनासमोर विविध तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत त्यामुळे गत १५ दिवसात केवळ चार तालुक्याचा अहवाल पूर्ण होऊ शकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी आर्र्थिक मदत मिळण्यासाठी एक लाख २३ हजार पीक विमाधारक शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले आहेत. या नुकसानग्रस्तांना विमा कंपनीच्या निकषानुसार पीक विमा मंजुर करण्यासाठी प्रशासन शेतकरी संख्या, नुकसान झालेले क्षेत्र, त्याचे प्रमाण आदि माहिती संकलीत करुन अहवाल तयार करीत आहे. ही माहिती संकलीत करताना प्रशासनासमोर विविध तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत त्यामुळे गत १५ दिवसात केवळ चार तालुक्याचा अहवाल पूर्ण होऊ शकला आहे.
जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांसह काढणी केलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून ८ नोव्हेंबरपर्यंत पिकांचे पंचनामे पूर्ण केले. तथापि, या पंचनाम्यानंतर पीक विमा न भरणाºया आणि पीक विमा भरणाºया शेतकºयांचे स्वतंत्र अहवाल तयार करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागली. जिल्ह्यात २ लाख ९६ हजार १२५ शेतकºयांनी २ लाख ४ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा उतरविला होता. त्यातील १ लाख २३ हजार ७६० शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले. या अर्जानुसार प्रशासनाने शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेही केले. यानुसार पीक विमा काढणाºया शेतकºयांपैकी ५६ हजार ५२९ शेतकºयांच्या ३२ हजार ३५८ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील उभ्या पिकांचे, तर १ लाख २६ हजार ६८ शेतकºयांच्या १ लाख ४६ हजार ७२ हेक्टर क्षेत्रातील काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. अर्थात पीक विमा काढणाºया एकूण १ लाख ८२ हजार ५९७ शेतकºयांच्या १ लाख ७८ हजार ४३० पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. तथापि, या शेतकºयांना पीकविम्याच्या निकषानुसार मदत देण्यासाठी सर्वकष अहवाल तयार करावा लागत आहे. हा अहवाल विविध प्रपत्रात असून, यासाठी कृषी विभागाची कसरत सुरू आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात उभ्या पिकांचे क्षेत्र वेगळे असून, काढणी पश्चात पिकांचे क्षेत्र वेगळे नमूद करावे लागत आहे.
त्यातच हा अहवाल तयार करताना शेतकºयाचे नाव, ओळख क्रमांक गाव, पेरणीचे क्षेत्र, बाधित क्षेत्र ही अचूक माहिती नमूद करावी लागत आहे. हे काम जिकिरीचे असल्याने प्रशासन कार्यालयीन वेळेनंतर अतिरिक्त वेळ यासाठी खर्ची घालत आहे. तथापि, आजपर्यंत केवळ मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा या चार तालुक्यांचेच अहवाल पूर्ण झाले आहेत. अद्याप वाशिम आणि रिसोड या दोन तालुक्यांच्या अहवालासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.
(प्रतिनिधी)
पिक विमाधारकांना निर्धारित निकषानुसार निधी मिळावा म्हणून बारकाईने यादया तयार करण्याचे काम करण्यात येत आहे.
- ज्ञानेश्वर बोबडे
जिल्हा समन्वयक, कृषी पीक विमा कंपनी,वाशिम
नुकसानग्रस्त पीक विमा धारकांच्या यादया तयार करण्यासाठी प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहेत.
-शंकरराव तोटावार
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाशिम