प्रलंबित मागण्यांसंदर्भात वाशिमचे महसूल कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:39 PM2017-12-06T16:39:03+5:302017-12-06T16:42:07+5:30
वाशिम - महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ११ डिसेंबर रोजी मागणी दिन पाळला जाणार आहे. यादिवशी जिल्हास्तरावर कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने केले जाणार आहेत.
वाशिम - महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ११ डिसेंबर रोजी मागणी दिन पाळला जाणार आहे. यादिवशी जिल्हास्तरावर कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने केले जाणार आहेत. महसूल कर्मचाºयांच्या या आंदोलनामुळे ११ डिसेंबरला कामकाज प्रभावित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महसूल कर्मचाºयांच्या विविध मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. जूनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अग्रस्थानी आहे. अशातच आता ३० टक्के नोकरी कपातीचे संकेत दिल्याने कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी विविध मागार्ने तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आंदोलन करण्यात आले. आश्वासनाखेरीज काहीच पदरी पडले नाही, असा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. आंदोलने झाली की आश्वासन मिळते. मात्र, आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी कार्यवाहीला गती मिळत नसल्याने कर्मचारी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्यातील सरकारी कर्मचाºयांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे, पाच दिवसाचा आठवडा, नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन सर्व कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करणे, महिला कर्मचाºयांना दोन वषार्ची बाल संगोपन रजा, अनुकंपा तत्वावर विना अट भरती आदी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता कर्मचारी संघटनांनी ११ डिसेंबरचा मुहूर्त शोधला आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, ११ डिसेंबर रोजी राज्यभरात ह्यमागणी दिनह्ण पाळला जाणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील कर्मचारी आपापल्या कार्यालयांसमोर निदर्शने करतील, असा एकमुखी निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातही सदर आंदोलन राबविले जाणार आहे, अशी माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.