वाशिम : शौचालय बांधकामप्रकरणी ग्रामसेवकांची आढावा बैठक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:11 PM2018-03-29T15:11:27+5:302018-03-29T15:11:27+5:30
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्या चमूने २९ मार्च रोजी वाशिम व मंगरूळपीर येथे शौचालय बांधकाम, छायाचित्र अपलोड, आर्थिक नोंदी आदींसंदर्भात ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली.
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्या चमूने २९ मार्च रोजी वाशिम व मंगरूळपीर येथे शौचालय बांधकाम, छायाचित्र अपलोड, आर्थिक नोंदी आदींसंदर्भात ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली.
ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. जिल्ह्यात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. ३१ मार्चपूर्वी छायाचित्र अपलोड करण्याचे काम पुर्णत्वाकडे नेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी २९ मार्च रोजी वाशिम पंचायत समिती येथील सभागृहात सकाळी ९.३० वाजता ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली. यावेळी आर्थिक नोंदी तसेच छायाचित्र अपलोड करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयांनी ३१ मार्चपूर्वी शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करावे, अशा सूचना इस्कापे यांनी दिल्या. त्यानंतर दुपारी १२.३० वाजतानंतर मंगरूळपीर पंचायत समिती येथे आढावा बैठक घेण्यात आली. १०० टक्के छायाचित्र अपलोड केलेल्या पाच ग्रामसेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. छायाचित्र अपलोडचे उर्वरीत काम येत्या २४ तासात करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी दिले. छायाचित्र अपलोड झाल्यानंतर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पुढील टप्प्यात राबवावयाच्या विविध उपक्रम व कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या सूचनेनुसार २९ मार्च रोजी जिल्हा स्वच्छता कक्षाने पंचायत समितीनिहाय आढावा घेत ३१ मार्चपूर्वी सर्वांनी शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इस्कापे यांनी केले.