वाशिम : संचारबंदी शिथिल होताच रस्त्यांवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:57 AM2020-04-14T10:57:57+5:302020-04-14T10:58:03+5:30

अत्यावश्यक कामासाठी संचारबंदीत ८ ते १२ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.

WASHIM: Roads crowded as communication barrier relaxed | वाशिम : संचारबंदी शिथिल होताच रस्त्यांवर गर्दी

वाशिम : संचारबंदी शिथिल होताच रस्त्यांवर गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र लॉकडाऊन व जिल्हयात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीत कोणीही घराच्या बाहेर निघु नये अश्याा सूचना जिल्हा प्रशासनाने केले असून नागरिकांच्यावतिने नियमांचे पालनही होतांना दिसून येत आहे. परंतु अत्यावश्यक कामासाठी संचारबंदीत ८ ते १२ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. या संचारबंदी शिथीलते दरम्यान मात्र रस्त्यांवर मोठया प्रमाणात गर्दी होत असून ती थांबविण्यासाठी प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत आहेत.
वाशिम जिल्हयात कोरोना विषाणुचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाचे प्रयत्न कौतूकास्पद आहेत. सर्वत्र जिल्हाबंदीनंतर एकही कोरोना संदिग्ध रुग्ण जिल्हयात आढळला नाही. जो रुग्ण आढळला होता त्याचीही प्रकृती ठणठणीत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतिने जिल्हाधिकारी रुषिकेष मोडक रात्रंदिवस झटून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. तर पोलीस अधीक्षक वसंत परदेसी संभाव्य धोका पाहता आपल्या कर्मचाऱ्यांना घरदार सोडून कर्तव्य बजावण्यास सांगत आहेत. जिल्हातील प्रत्येक नागरिक सुखरुप रहावा यासाठी प्रयतन करीत असतांना नागरिक मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखतांना दिसून येत नाहीत. अत्यावश्यक काम असल्यास घरातील एका व्यक्तीने ते बाहेर निघून पूर्ण करणे गरजेचे असताना शिथील काळात नागरिक लहान मुलांसह आपल्या कुटुंबियासह बाहेर निघत आहेत. त्यांना कोणी समजावून सांगावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोराना विषाणुच्या पार्श्यभूमिवर नागरिकांनी घरातच राहून येणाºया धोक्यापासून सावध राहण्याचे प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे , याकडे सर्वांनी गांभीर्याने घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतिने कळकळीने केल्या जात आहे.


सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली!
कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हयात लागू असलेल्या संचारबंदीचे नागरिकांकडून पालीन होत असले तरी संचारबंदी शिथीलतेमध्ये मात्र रस्त्यांवर , दुकानांवर मोठया प्रमाणात नागरिक गर्दी करुन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करताना दिसून येत नाही. कोरोना विषाणु संसर्गजन्य असल्याने सोशल डिस्टन्सिंग अतिशय महत्वाचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासन वारंवार सूचना देऊन, गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवत असतांना काही नागरिक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना तिलांजली देताना दिसून येत आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेऊन मी व माझया कुटुंबियांचे संरक्षणासाठभ् सोशल डिस्टन्सिंगचे पालन करेल हे ठरविणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºयांवर कठोर कारवाईची गरज आहे.

कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता गर्दी टाळा
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. नागरिकांनीदेखील कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडू नये.तसेच गर्दी तर मुळीच करु नये.
-ऋषिकेश मोडक, जिल्हाधिकारी वाशिम

 

Web Title: WASHIM: Roads crowded as communication barrier relaxed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम